KKR vs DC IPL 2024 esakal
IPL

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

अनिरुद्ध संकपाळ

Kolkata Knight Riders Vs Delhi Capitals IPL 2024 : मागील पाचपैकी चार सामन्यांत विजय मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला उद्या (ता. २९) होत असलेल्या आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत कोलकता नाईट रायडर्सशी सामना करावयाचा आहे. घरच्या मैदानावर ही लढत असली तरी मागील पाचपैकी तीन लढतींमध्ये कोलकत्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सध्याचा फॉर्म बघता दिल्लीचे पारडे जड म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याच्याऐवजी दिल्लीच्या संघात जेक फ्रेसर मॅकगर्क याची निवड करण्यात आली. याचा फायदा दिल्ली संघाला झाला आहे. मॅकगर्क याने पाच सामन्यांमधून तीन अर्धशतकांसह २४७ धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने २३७.५०च्या स्ट्राईकरेटने धावा फटकावल्या आहेत. या युवा फलंदाजाने मुंबईविरुद्धच्या लढतीत २७ चेंडूंमध्ये ८४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

या लढतीत त्याने जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवरही आक्रमण केले. दिल्लीने या लढतीत मुंबईवर दहा धावांनी विजय संपादन केला. आता त्यांना कोलकतामधील ईडन गार्डन स्टेडियमवर लढत खेळावयाची आहे. या स्टेडियमवर झालेल्या पंजाब- कोलकतामधील मागील लढतीत ५२३ धावांची फटकेबाजी करण्यात आली होती. या लढतीत ४२ विक्रमी षटकारही मारण्यात आले. पंजाबने सर्वाधिक २६२ धावांचा यशस्वी पाठलागही केला.

याच पार्श्वभूमीवर दिल्ली- कोलकता यांच्यामधील लढतीतही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोलकता संघातील गोलंदाजांसमोर मॅकगर्कला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

जेक मॅकगर्कचा दिल्लीच्या संघात प्रवेश झाल्यापासून संघाच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे; पण या संघातील इतर फलंदाजही चमक दाखवत आहेत. रिषभ पंत (३७१ धावा), ट्रिस्टन स्टब्स (२७३ धावा), अभिषेक पोरेल (१८४ धावा) यांनीही महत्त्वाच्या क्षणी धावा उभारल्या आहेत.

गोलंदाजी विभागात कुलदीप यादव (१२ विकेट), अक्षर पटेल (७ विकेट) या दोन फिरकीवीरांनी दिल्ली संघासाठी छान प्रदर्शन केले आहे. मुकेशकुमार (१३ विकेट) व खलील अहमद (१२ विकेट) यांनी प्रतिस्पर्धी फलंदाज बाद केले असले तरी त्यांच्या गोलंदाजीवर अनुक्रमे ११.०५ व ९.४८च्या सरासरीने धावा काढण्यात आल्या आहेत. दोघांनाही धावांवर नियंत्रण राखावे लागणार आहे.

सुनील नारायणचा ‘वन मॅन शो’

कोलकता संघाने आतापर्यंत झालेल्या आठपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यंदाच्या मोसमात त्यांच्यासाठी सुनील नारायण याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने एक शतक व दोन अर्धशतकांसह ३५७ धावा फटकावल्या आहेत. तसेच १८४.०२च्या स्ट्राईकरेटने नारायणने फटकेबाजी केली आहे. गोलंदाजीतही त्याने ठसा उमटवला आहे. ६.९६च्या इकॉनॉमी रेटने धावा देताना त्याने १० फलंदाजही बाद केले आहेत. कोलकता संघ त्याच्या कामगिरीवर अवलंबून आहे.

इतर विभागांत सुधारणा हवी

कोलकता संघाने पाच सामन्यांमध्ये विजय मिळवून चमकदार खेळ दाखवला असला तरी प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आपला खेळ आणखीन उंचावण्याची गरज आहे. सुनील नारायण व फिल सॉल्ट हे सातत्याने छान फलंदाजी करीत आहे; पण श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, अंगक्रीश रघुवंशी, रिंकू सिंग यांनी दबावाखाली आपला खेळ उंचावण्याची गरज आहे.

आंद्रे रसेलच्या अष्टपैलू कामगिरीवरही कोलकता संघ अवलंबून आहे. हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा यांनी गोलंदाजीत सुधारणा करणे आवश्‍यक आहे. कोलकत्याच्या खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणातही चुका घडून आल्या आहेत. यामध्येही कामगिरी उंचवावी लागणार आहे.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT