IPL

IPL 2023 : कोलकत्यासमोर गतविजेत्यांचे आव्हान! गुजरात टायटन्सचा संघ सहाव्या विजयासाठी मैदानात उतरणार

Kiran Mahanavar

IPL 2023 : कोलकता नाईट रायडर्स संघाने मागील लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला पराभूत करून सलग चार लढतींमध्ये झालेल्या पराभवाची मालिका खंडित केली. आता कोलकता नाईट रायडर्सचा संघ आज घरच्या मैदानावर होणाऱ्या आयपीएल लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सशी दोन हात करणार आहे. हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्सचा संघ सलग तिसऱ्या विजयासह या मोसमातील सहाव्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसेल.

कोलकतासाठी जेसन रॉय हा परदेशी खेळाडू ट्रम्प कार्ड करण्याची शक्यता आहे. त्याने आतापर्यंत तीन लढतींमधून दोन अर्धशतकांसह १६० धावा फटकावल्या आहेत. बंगळूरविरुद्धच्या लढतीतही त्याने शानदार अर्धशतकी खेळी साकारत कोलकत्याच्या विजयाची भक्कम पायाभरणी केली. पण आंद्रे रस्सेल व सुनील नारायण हे परदेशी खेळाडू आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरीत आहेत. याचा फटकाही कोलकताला बसतो आहे. वरुण चक्रवर्ती व सुयश शर्मा या फिरकी गोलंदाजांनी बंगळूरविरुद्धच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

कोलकात्याचा वेगवान गोलंदाजीचा विभाग थोडासा कमकुवत वाटत आहे. यामध्ये वारंवार बदल केले जात आहेत. उमेश यादव याला सातत्याने खेळवले जात असले तरी त्याला अद्याप अव्वल दर्जाची कामगिरी करता आलेली नाही. टीम साऊथी, लॉकी फग्युर्सन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, कुलवंत खेजरोलिया, डेव्हिड वीजा या गोलंदाजांची संगीत खुर्ची सुरु आहे. कधी याला तर कधी त्याला संघात स्थान दिले जात आहे. गुजरातविरुद्धच्या लढतीत शार्दुलला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

गुजरातचे बहुतांशी खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. शुभमन गिल, रिद्धीमान साहा, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया हे फलंदाजीत ठसा उमटवत आहेत. हार्दिक पंड्या तर कर्णधार, फलंदाज आणि गोलंदाज अशी तिहेरी भूमिकाही चोख पार पाडत आहे. मोहम्मद शमी, मोहीत शर्मा वेगवान गोलंदाजीची धुरा नीट सांभाळत आहेत. राशीद खान, नूर अहमद ही अफगाण फिरकी जोडी प्रतिस्पर्ध्यांना बांधून ठेवण्यात यशस्वी होत आहे.

हार्दिकचे कुशल नेतृत्व

गुजरातचा संघ मागील वर्षी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी झाला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पहिल्याच वर्षी गुजरातने विजेता होण्याचा मान संपादन केला. हार्दिकच्या नेतृत्वात संघाने ३१पैकी २३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यामध्ये भारत तसेच गुजरात या दोन्ही संघांना नेतृत्व करताना मिळवलेल्या विजयांचा समावेश आहे. हार्दिकच्या नेतृत्वात मिळवलेल्या विजयाची टक्केवारी ७६.६७ अशी आहे.

दिल्ली कॅपिटल्स - सनरायझर्स हैदराबाद या दोन तळाच्या संघांमध्येही आज लढत रंगणार आहे. नवी दिल्लीत हा सामना पार पडणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी सात लढतींमधून दोनच लढतींत विजय मिळवले आहेत. तसेच पाच लढतींमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादची सरासरी ही दिल्लीपेक्षा चांगली असल्यामुळे त्यांचा संघ गुणतालिकेत नवव्या आणि दिल्लीचा संघ दहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा प्रवास खडतर आहे. अंतिम चारमध्ये धडक मारण्यासाठी सात लढतींपैकी किमान सहा लढतींमध्ये विजय मिळवणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT