IPL 2024 Kolkata Knight Riders vs Mumbai Indians  sakal
IPL

KKR vs MI Score IPL 2024 : कोलकता प्लेऑफसाठी पात्र! हेलखावे खाणाऱ्या मुंबई इंडियन्सचा आणखी एक पराभव

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Kolkata Knight Riders vs Mumbai Indians : पराभवाच्या खाईत हेलखावे खाणाऱ्या मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव करुन कोलकता संघ यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफ गाठणारा पहिला संघ ठरला. १२ सामन्यांतून त्यांनी नऊ विजयांसह सर्वाधिक १८ गुणांची कमाई केली आहे.

पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी १६ षटकांच्या या सामन्यात कोलकताने १५७ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानासमोर ईशान किशनने ४० धावांची खेळी करत मुंबई संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली होती, परंतु रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव संघाला गरज असताना अपयशी ठरले. रोहितचा स्ट्राईक रेट तर ७९ इतका सूमार होता.

सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी गोलंदाजांनी मुंबई फलंदाजांच्या मुसक्या आवळल्या. हार्दिक पंड्या केवळ दोनच धावा करु शकला. त्यानंतक तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी प्रयत्न केले, परंतु ते कोलकताला विजयापासून रोखू शकले नाहीत.

बुमराचा स्वप्नवत चेंडू

फिल साल्टने पहिलाच चेंडू षटकार मारून जोरदार सुरुवात केली खरी, परंतु षटकातील पाचवा चेंडू अशा प्रकारे उंच मारण्याच्या प्रयत्नात त्याने विकेट गमावली. त्यानंतर बुमारे टाकलेला पहिला चेंडू स्वप्नवत होता. धडाकेबाज सुनील नारायणला काही कळायच्या आत या चेंडूने उजव्या यष्टीचा वेध घेतला. हवेत स्वींग झालेला चेंडू यष्टीच्या बाहेर जाईल हा विचार करुन त्याने सोडला, परंतु चेंडू थेट यष्टींवर आदळला.

साल्ट (६) आणि नारायण (०) अशी कोलकताची अडखळती सुरुवात झाली. दुसरा सामना खेळणाऱ्या कंबोजनेही श्रेयस अय्यरला चकवून त्याच्या यष्टींचा वेध घेतला. कोलकताचा संघ अडचणीत आल्याचे दिसत असताना व्यंकटेश अय्यरने उलटवार केला. त्याची आक्रमक फलंदाजी कोलकता संघाच्या खात्यात भराभर धावा जमा करत होती. मुंबईविरुद्धच वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही त्याने अशीच खेळी केली होती.

पियूष चावलाच्या पहिल्या षटकात व्यंकटेश ४२ धावा करुन बाद झाला. त्यानंतर नितीश राणा, आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांनी दिलेल्या योगदानामुळे कोलकताला १५७ धावा करता आल्या.

KKR vs MI Live Score IPL 2024 : पावसाची उसंत; नाणेफेक मुंबईनं जिंकली

पावसाने उसंत घेतली असून आता सामना प्रत्येकी 16 षटकांचा होणार आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

KKR vs MI Live Score IPL 2024 : पावसामुळे नाणेफेकीस उशीर

पावसामुळे नाणेफेकीस उशीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT