Kolkata Knight Riders X/IPL
IPL

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

Pranali Kodre

IPL 2024, KKR vs DC: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं उगीच म्हणत नाही, ज्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला दोन दिवसांपूर्वी पंजाब किंग्सविरुद्ध 261 धावाही विजय मिळवण्यासाठी कमी पडल्या होत्या, त्याच कोलकाता नाईट रायडर्स संघानं सोमवारी दिल्ली कॅपिटल्सला दिडशे धावा करण्यासाठीही संघर्ष करायला लावलाय... खरंतर कोलकाताने दिल्ली विरुद्ध अगदी सोपा विजय मिळवला असंच म्हणायला लागेल.

पंजाबविरुद्ध धावांची खैरात करणारा वरुण चक्रवर्तीच दिल्लीविरुद्ध मात्र कोलकातासाठी हिरो ठरला. त्यानं दिलेल्या धक्क्यांमधून दिल्लील सावरताच आलं नाही.

खरंतर टॉसवेळी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने पहिला बॅटिंगचा निर्णय घेतलेला. त्याने त्यावेळी पिच कोरडं आहे आणि स्पिनर्सला मदत होईल, असंही सांगितलेलं. पण कोलकाताचा कर्णधाराचं मत होतं नंतर पाठलाग करणं सोपंय त्यामुळे त्याला आधी बॉलिंग घ्यायची होती अन् पंतने बॅटिंग घेतल्यानं त्याच्या मनासारखंही झालं.

दिल्लीने बॅटिंग घेऊनही त्याला फायदा मात्र उचलता आलं नाही. यावेळी त्यांचा जॅक फ्रेझर-मॅकगर्क हा हुकमी एक्का कामी आला नाही. त्याला मिचेल स्टार्कने माघारी धाडलं. पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, शाय होप यांनाही वैभव अरोरा अन् हर्षित राणानं फार वेळ टिकू दिलं नाही.

दिल्लीची वरची फळी गडगडल्यानं मधल्या फळीवर दडपण होतं आणि याचाच फायदा वरुण चक्रवर्तीनं उचलला. त्यानं फिरकीचं जाळ विणलं आणि त्यात ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स अन् कुमार कुशाग्रला अडकवलं. त्यानं 4 ओव्हर पुर्ण केली तेव्हा त्याच्या खात्यात 16 धावा खर्चून 3 विकेट्स होत्या.

तरी शेवटी कुलदीप यादवं धैर्य दाखवलं त्यानं 5 चौकार अन् 1 षटकार ठोकून नाबाद 35 धावा करत कसंबस दिल्लीला दीडशे पार नेलं. त्याच्या खेळीनं 20 षटके झाले, तेव्हा दिल्लीचा स्कोअर होता 20 ओव्हरमध्ये 9 बाद 153 धावा. त्यामुळे कोलकाताला विजयासाठी हव्या होत्या अवघ्या 154 धावा.

कोलकाताकडून गेल्या काही सामन्यात आक्रमक सुरुवात करणारा सुनील नारायण या सामन्यातच मात्र शांत होता. पण असं असलं तरी दुसऱ्या बाजूनं फिलिप सॉल्टची बॅट मात्र तळपत होती. त्यानं 26 चेंडूतच अर्धशतक झळकावलं आणि कोलकातानंही 6 षटकातच 70 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या.

इतकी चांगली सुरुवात मिळाल्यानंतर कोलकाता सहज विजय मिळवेल असं वाटत होतं. पण अक्षर पटेलने सॉल्ट अन् नारायणची विकेट घेत दिल्लीच्या आशा पल्लवित केल्या, त्यातच रिंकू सिंगलाही लिझाद विल्यम्सनं माघारी धाडलं. पण तरी दिल्लीनं पुरेशा धावा केल्या नसल्यानं बॉलर्सकडे बचावासाठी फार काही उरलं नव्हतं.

मधल्या ओव्हर्समधील पडझडीनंतर कोलकाताचा डाव श्रेयस अय्यर अन् वेंकटेश अय्यरनं सावरला. त्यांनी नंतर नाबाद अर्धशतकी भागीदारी करत 17 व्या षटकातच कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हा कोलकाताचा 6 वा विजय ठरला, मात्र दिल्लीचा 6 वा पराभव. त्यामुळं कोलकाताचा पुढचा मार्ग सुकर झाला असला, तरी दिल्लीच्या अडचणींमध्ये वाढ झालीये इतकं नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT