Stunning Catches during LSG vs KKR | IPL 2024 Sakal
IPL

LSG vs KKR: फक्त गॉथम-रमणदीपनेच नाही, तर बाऊंड्री लाईनवर बॉल-बॉयनंही घेतला अफलातून कॅच; जॉन्टी ऱ्होड्सनेही केलं कौतुक

IPL 2024, LSG vs KKR Video: आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यादरम्यान कृष्णप्पा गॉथम आणि रमणदीप सिंगने शानदार कॅच घेतले. इतकेच नाही, तर बॉल बॉयने घेतलेल्या एका कॅचने जॉन्टी ऱ्होड्सलाही चकीत केले.

Pranali Kodre

IPL 2024, LSG vs KKR Catches Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 54 वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 98 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात काही अफलातून झेल घेण्यात आले, ज्याची चर्चाही झाली.

या सामन्यात लखनौकडून बदली क्षेत्ररक्षक म्हणून क्षेत्ररक्षण केलेल्या कृष्णप्पा गॉथम आणि कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू रमणदीप सिंगने शानदार झेल घेतले. इतकेच नाही, तर बाऊंड्री लाईनवर असलेल्या एका बॉल बॉयनेही एक अप्रतिम झेल घेतला, ज्याचे कौतुक लखनौचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सनेही केले.

गॉथमच्या झेलनेही केलं ऱ्होड्सला प्रभावित

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सकडून फिल सॉल्ट आणि सुनील नारायणने आक्रमक सुरुवात केली होती. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर मधल्या षटकात कोलकाताहीने काही मोठ्या विकेट्स गमावल्या, त्यात आंद्रे रसेलच्या विकेटचाही समावेश आहे.

रसेलने नवीन-उल-हकच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. पण त्याची विकेट घेण्याच गॉथमनेही महत्त्वाची भूमिका बजावली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या रसेलविरुद्ध १५ व्या षटकातील दुसरा चेंडू नवीनने काहीसा वाईड टाकला, ज्यावर रसेलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

परंतु, चेंडू वर उडाला. यावेळी एक्स्ट्रा कव्हरवरून पळत येत गॉथमने चेंडूवर लक्ष ठेवत सूर मारून दोन्ही हातांनी अफलातून झेल घेतला. त्याचा हा झेल पाहून ऱ्होड्सही खूश झाला. त्याने डगआऊटमधूनच त्याचे कौतुक केले.

रमणदीपचाही भन्नाट झेल

कोलकाताने दिलेल्या 236 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी लखनौकडून कर्णधार केएल राहुलसह सलामीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अर्शिन कुलकर्णी उतरला. मात्र, दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शिन कुलकर्णीला मिचेल स्टार्कने बाद केले.

स्टार्कने टाकलेल्या चेंडूवर अर्शिनने मोठा फटका खळण्याचा प्रयत्न केला. परंतु, कव्हरच्या क्षेत्रातून पळत येत रमणदीपने सूर मारत शानदार झेल घेतला. त्यामुळे अर्शिनला 7 चेंडूत 9 धावा करून माघारी परतावे लागले.

रमणदीपने नंतर 8 व्या षटकात हर्षित राणाच्या चेंडूवर केएल राहुलचाही 25 धावांवर सोपा झेल घेतला.

बॉल बॉयच्या झेलने ऱ्होड्सलाही केलं चकीत

दरम्यान, लखनौकडून पहिली विकेट गेल्यानंतर केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस फलंदाजी करत होते. यावेळी वैभव अरोरा गोलंदाजी करत असलेल्या तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्टॉयनिसने डीप थर्ड मॅनच्या दिशने षटकार खेचला.

त्यावेळी बाऊंड्री लाईनजवळ असलेल्या बॉल बॉयने अप्रतिम कौशल्य दाखवत तो षटकाराचा चेंडू झेलला. त्याने घेतलेला झेल पाहून लखनौच्या डगआऊटमध्ये बसलेला जॉन्टी ऱ्होड्सही खुश झाला. त्याला करारबद्ध करण्याचा इशाराही त्याने केला.

लखनौचा पराभव

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 235 केल्या.

कोलकाताकडून सुनील नारायणने 81 धावांची खेळी केली, तर फिल सॉल्टने आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी प्रत्येकी 32 धावा केल्या. तसेच रमणदीप सिंगने 6 चेंडूत नाबाद 25 धावांची खेळी केली. लखनौकडून गोलंदाजीत नवीन-उल-हकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 236 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला 16.1 षटकात सर्वबाद 137 धावाच करता आल्या. लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने 36 धावांची खेळी केली, तसेच केएल राहुलने 25 धावा केल्या. बाकी कोणालाही 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. कोलकाताकडून गोलंदाजीत हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT