Kuldeep Yadav Shine Delhi Capitals Defeat Lucknow Super Giants esakal
IPL

LSG vs DC : शेवटी कुलदीपच उभा राहिला! दिल्लीनं डिफेंडर लखनौचा डिफेन्स भेदला

अनिरुद्ध संकपाळ

Kuldeep Yadav Shine Delhi Capitals Defeat Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्स ही आयपीएल 2024 मधील एक टोटल डिफेंड करणारी तगडी टीम! मात्र या टोटल डिफेंड करण्यात अव्वल असलेल्या डिफेंडर लखनौलचा डिफेन्स दिल्लीनं भेदून दाखवला! दिल्लीनं लखनौचं 167 धावांचं टार्गेट 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. दिल्लीनं जरी चांगला चेस केला असला तरी सामन्याचा हिरो ठरला तो चायनामन कुलदीप यादव!

लखनौच्या इकाना स्टेडियमवर लखनौनं टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय अन् सामना जिंकलेला नाही असं कधी झालं नव्हतं. आजही केएल राहुलनं नाणेफेक जिंकली. दिल्लीचं टेन्शन वाढलं होतं. त्यात केएल राहुलच्या मदतीनं लखनौनं पॉवर प्लेमध्येच अर्धशतकी मजल मारली होती. दिल्लीनं लखनौला दोन धक्के दिले होते.

मात्र कर्णधार केएल राहुल खेळपट्टीवर टिकून होता. पॉवर प्लेचा खेळ पाहून लखनौ दिल्लीला मोठं टार्गेट देणार असं वाटत होतं. पॉवर प्लेनंतर कुलदीप यादव गोलंदाजीला आला अन् सामन्याचं चित्रच पालटून गेला.

त्यानं आठव्या षटकात लखनौच्या दोन मोठ्या शिकार केल्या. मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांना पाठोपाठच्या चेंडूवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावत कुलदीपनं लखनौची अवस्था 2 बाद 66 वरून 4 बाद 66 अशी केली.

कुलदीपनं जरी दोन फलंदाज गार केले असले तरी अजून मोठा धोका टळला नव्हता. केएल राहुल अजून खेळपट्टीवर ठाण मांडून बसला होता. राहुलला साथ देण्यासाठी हुड्डा आला होता. ही जोडी दिल्लीसाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत होतं. तेवढ्यात कुलदीपनं पुढच्या षटकात केएल राहुलची 39 धावांची खेळी संपवली. पंतनेही विकेटच्या मागं चपळाई दाखवली होती.

लखनौचा पाय खोलात गेला होता. सेट झालेला कर्णधार माघारी परतला अन् लखनौच्या बॅटिंगला ग्रहण लागलं. इशांत शर्मा अन् मुकेश कुमारनं अजून दोन धक्के देत लखनौला शंभरच्या आत गुंडाळण्याची तयारी सुरू केली होती.

मात्र संघाची अवस्था 7 बाद 94 अशी झाली असताना आयुष बदोनी आणि अर्शद खान लखनौसाठी धावून आले. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 73 धावांची झुंजार भागीदारी रचली. बदोनीने 55 धावांची खेळी केली तर अर्शदनं नाबाद 20 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. त्यामुळं शंभरच्या आत अडखळणारी लखनौ 167 धावांपर्यंत पोहचली.

दिल्लीसमोर 167 धावांचं तसं डिसेंट टार्गेट होतं. त्यात डेव्हिड वॉर्नर अन् पृथ्वी शॉकडून संथ सुरूवात झाली होती. वॉर्नर तर 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र पृथ्वी शॉनं पॉवर प्लेचा फायदा उचलत संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. पृथ्वी 22 चेंडूत 32 धावा करून बाद झाला मात्र त्यानं आपलं काम केलं होतं.

दिल्लीनं 7 षटकात 63 धावांपर्यंत मजल मारली होती. शॉ बाद झाल्यानंतर पदार्पण करणारा जॅक फ्रासेर - मॅक्गर्क अन् पंतनं आपल्या भागीदारीची संथ सुरुवात केली. 10 व्या षटकापर्यंत सेट झाल्यानंतर पंत आणि मार्कनं धावांचा पाऊस पाडण्यास सुरूवात केली. बघता बघता या दोघांनी संघाला 15 व्या षटकात 140 धावांपर्यंत पोहचवलं.

पंत आणि जॅकच्या 76 धावांच्या भागीदारीमुळं दिल्लीनं सामन्यावर पकड निर्माण केली. मात्र त्यानंतर जॅक अर्धशतक करून अन् पंत 41 धावा करून बाद झाला. विजयाची औपचारिकता ट्रिस्टन स्टब्स आणि शाय होपनं पूर्ण केली. त्यांनी 18.1 षटकात विजयासाठी आवश्यक 167 धावा केल्या. दिल्लीनं या विजयासोबतच पॉईंट टेबलमधील तळ सोडला.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

Latest Maharashtra News Updates : १०० टक्के मतदान करण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वोट फॉर रन मॅरेथॉनचं आयोजन

Winter Health : पौष्टिक आहारच वाढवेल प्रतिकारशक्ती

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

SCROLL FOR NEXT