मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील (IPL 2022) पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. तर दुसऱ्या दिवशी सुपर संडेला पहिलाच सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या दोन्ही सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील दोन यादवांनी (Yadav) स्टार संघांना सुरुवातीलाच मोठे झटके दिले.
कालच्या सामन्यात केकेआरच्या (KKR) उमेश यादवने (Umesh Yadav) नवीन चेंडूवर कमाल गोलंदाजी करत सीएसकेची टॉप आर्डर उडवली. ज्या उमेश यादववर खर्चित गोलंदाज, सौरभैर मारा करणारा वेगावान गोलंदाज असा शिक्का बसला होता त्या उमेश यादवने सीएसकेविरूद्ध वानखेडेच्या खेळपट्टीवर दोन विकेट काढल्या. त्याने पहिल्याच षटकात गेल्या हंगामातील पर्पल कॅप होल्डर ऋतुराज गायकवाडला भोपळाही फोडू दिला नाही. याचबरोबर त्याने दुसरा सलामीवीर कॉनवॉयला 3 धावांवर बाद करत सीसीएसकेची पॉवर प्लेमध्ये अवस्था 2 बाद 28 अशी केली. कालच्या सामन्यात उमेश यादवची बॉलिंग फिगर ही जबरदस्त राहिली. त्याने 4 षटकात 20 धावा देत 2 विकेट घेतल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
आज मुंबई आणि दिल्लीच्या (DC) सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने दमदार सुरूवात करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रयत्नाला कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) चांगलाच सुरूंग लावला. त्याने 41 धावा करणाऱ्या रोहित शर्माला बाद करत मुंबईला पहिला आणि मोठा धक्का दिला. त्या पाठोपाठ अनमोलप्रीत सिंगला 8 धावांवर घरचा रस्ता दाखवला. कुलदीप यादव इतक्यावरच शांत बसला नाही तर त्याने मुंबईचा भीम म्हणून ओळखला जाणारा कायरन पोलार्डला अवघ्या 3 धावांवर बाद करत आपली तिसरी शिकार केली. उमेश यादव आणि कुलदीप यादव हे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघात दिसले नव्हते. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांनी पहिल्याच सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.