Kumar Sangakkara teaches sanju samson  esakal
IPL

Video: सामन्यापूर्वी संगकाराने संजूची घेतली 'शिकवणी'

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) आज पुण्याच्या एमसीए मैदानावर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनकडून (Sanju Sanson) संघाचा क्रिकेट सल्लागार कुमार संगकाराने (Kumar Sangakkara) विकेटच्या मागे चांगलाच सराव करून घेतला. या बाबतचा व्हिडिओ संध्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Kumar Sangakkara teaches sanju samson wicket keeping drills video viral)

राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद आजपासून आपल्या आयपीएल हंगामाची सुरुवात करत आहेत. या दोन्ही संघ हंगामाची विजयी सुरुवात करण्यासाठी नेटमध्ये चांगलाच घाम गाळत आहेत. दरम्यान, राजस्थानचा कर्णधार जगातील अव्वल विकेटकिपर म्हणून गणल्या गेलेल्या कुमार संगराकडून विकेट किपिंगचे (Wicket Keeping) धडे घेताना दिसला. या व्हिडिओत संगाकारा तन्मयतेने संजू सॅमसनला विकेटकिपिंगचे ड्रिल्स शिकवत होता. संगकारा या व्हिडिओत स्पिनर्सच्या लेग स्टंपवरून जाणाऱ्या चेंडूवर कसा प्रकारे विकेट किपिंग करायची याचे धडे संजूला देत होता.

राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोघेही आपल्या पहिल्या विजयासाठी आत प्रयत्नशील असतील. आयपीएलच्या (IPL 2022) आतापर्यंत झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांनी विजयी सुरुवात केली आहे. आजचा सामना हा पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर रंगणार आहे. एमसीएची खेळपट्टी ही साधारणपणे फलंदाजांना पोषक असते. त्यात दव पडले तर गोलंदाजांच्या डोकेदुखीत अणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT