MI vs GT IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्याकडे आयपीएल 2024 मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना म्हणून पाहिलं जात आहे. या सामन्याची हाईप चांगलीच होत आहे. मुंबई इंडियन्सचा संघ हा मराठी अस्मिता जपणारा संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मराठी यूट्यूबर देखील या संघाचा प्रचार करण्यात मागे नाहीयेत. आता मराठीतील प्रसिद्ध यूट्यूबर विनायक माळीचा देखील एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. या व्हिडिओत खुद्द लसिथ मलिंगा हा मराठीतून बोलताना दिसतोय.
आयपीएलच्या सुपर संडेमध्ये आज पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. गुजरातला पहिल्याच हंगामात विजेतेपद आणि दुसऱ्या हंगामात उपविजेतेपद मिळवून देणारा हार्दिक पांड्या ट्रेडद्वारे मुंबई इंडियन्समध्ये परतला. त्यानंतर रोहितला कर्णधार पदावरून हटवून मुंबईने हार्दिक पांड्याच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ घातली.
दुसरीकडे आशिष नेहरा आणि हार्दिक ही गुजरातची हिट जोडी देखील फुटली. त्यामुळे गुजरात टायटन्स देखील या ट्रेडमुळे फार खुश असणार नाही. अशा परिस्थितीत हे दोन्ही संघ हंगामातील पहिला सामना एकमेकांविरूद्धच खेळणार आहेत. या सामन्याची हाईप जबरदस्त असणार आहे. त्यातच यूट्यूबर विनायक माळीच्या या नव्या व्हिडिओमुळे आणखी भर पडली आहे.
विनोदी व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या विनायकने मुंबई इंडियन्ससाठी एक व्हिडिओ केला. या व्हिडिओत विनायक मुंबईच्या खेळाडूंना शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करताना दिसतोय. यावेळी विनायकने गुजरातविरूद्धच्या सामन्यात गुजरातची वाट लावून टाका. असं म्हणत संघाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लसिथ मलिंगाने भाऊ हा फक्त एक गेम आहे असे मराठीतून सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.