Punjab Kings vs Delhi Capitals  esakal
IPL

PBKS vs DC Liam Livingstone : दोन गुणांसाठी लिव्हिंगस्टोन शेवटपर्यंत भिडला, मात्र अखेर दिल्लीने तळ सोडलाच

अनिरुद्ध संकपाळ

LiamL ivingstone Punjab Kings vs Delhi Capitals : पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. मात्र अखेरीस दिल्लीने हा सामना 15 धावांनी जिंकला. याचबरोबर पंजाब किंग्जची प्ले ऑफ गाठण्याची शेवटची आशा देखील मावळली. दिल्ली यापूर्वीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली होती. मात्र त्यांनी आजच्या सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेचा तळ सोडला. पंजाबचे आता 13 सामन्यात 12 गुण झाले आहेत. त्यांनी पुढचा सामना जिंकला तरी त्यांचे 14 गुण होतील.

दिल्लीने पंजाबसमोर विजयासाठी 214 धावांचे आव्हान ठेवले होते. पंजाब किंग्जकडून लिम लिव्हिंगस्टोनने 48 चेंडूत 94 धावा चोपत संघाला विजय मिळवून देण्याचा अटोकाट प्रयत्न केला. अखेरच्या षटकात 33 धावांची गरज होती. मात्र पंजाबला 17 धावाच करता आल्या. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि नॉर्त्जेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. पंजाबच्या अथर्व तायडेनेही 55 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली झुंज दिली.

दिल्ली कॅपिटल्सने रिली रूसोच्या नाबाद 82 धावांच्या जोरावर पंजाबसमोर 214 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र दिल्लीच्या खलील अहदमने पॉवर प्लेचे पहिलेच षटक निर्धाव टाकत दिल्लीच्या सलामीवीरांवर दबाव निर्माण केला. दुसऱ्याच षटकात शिखर धवन शुन्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर प्रभसिमरन आणि अथर्व तायडे यांनी सातव्या षटकात पंजाबचे अर्धशतक धावफलकावर लावले.

मात्र ही जोडी अक्षर पटेलने फोडली. त्याने प्रभसिमरनला 22 धावांवर बाद केले. यानंतर अथर्व तायडे आणि लिम लिव्हिंगस्टोनने पंजाबची गाडी रूळावर आणण्यास सुरूवात केली. या दोघांनी फटकेबाजी करत पंजाबला 15 व्या षटकात 128 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, अथर्वने आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

मात्र यानंतर पंजाबजच्या डावाला गळती लागली. अथर्व रिटायर्ड हर्ट झाला, जितेश शर्मा 0 तर शाहरूख खान 6 धावांची भर घालून परतले. मात्र दुसऱ्या बाजूने लिम लिव्हिंगस्टोन फटकेबाजी करत सामना जिवंत ठेवत होता. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला साथ देणारे फलंदाज एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनमध्ये परतत होते. सॅम करन 11 धावा करून बाद झाला तर हरप्रीत ब्रार शुन्यावर धावबाद झाला.

अखेरीच्या दोन षटकात दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत लिव्हिंगस्टोनचा झंजावात राखण्यात यश आले. 12 चेंडूत 38 धावांची गरज असताना नॉर्त्जेने 19 व्या षटकात फक्त 5 धावा दिल्या. त्यानंतर सामना 6 चेंडूत 33 धावा असा आला असताना इशांत शर्माने फक्त 17 धावा दिल्या. यामुळे दिल्लीने सामना 15 धावांनी जिंकला. लिव्हिंगस्टोनने 9 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 48 चेंडूत 94 धावा चोपल्या. मात्र त्याची एकाकी झुंज विजयापर्यंत पोहचू शकली नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT