Punjab Kings Liam Livingstone kagiso Rabada  esakal
IPL

IPL 2023 Punjab Kings : दणकट पंजाबची ताकद अजून वाढणार; गब्बर सेनेत दाखल होणार दोन दिग्गज

अनिरुद्ध संकपाळ

Punjab Kings Liam Livingstone kagiso Rabada : पंजाब किंग्जने IPL 2023 ची सुरूवात एकदम धडाक्यात केली आहे. पंजाबने पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत हंगामाची सुरूवात विजयाने केली. त्यांनंतर तगड्या समजल्या जाणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा यंदाचा पंजाबचा संघ हा सर्वात मजबूत संघ म्हणून ओळख निर्माण करत आहे. आता या आधीच मजबूत असलेल्या संघात दोन तगडे खेळाडू सामील होणार आहेत.

पंजाब किंग्जने आपले पहिले दोन सामने जिंकून दमदार सुरूवात केलीय. पहिल्या दोन सामन्यातच पंजाबचा संघ एकदम तगडा दिसत होता. आता या संघाची ताकद येत्या काळात अजून वाढणार आहे. इंग्लंडचा आक्रमक फलंदाज लिम लिव्हिंगस्टोन आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा हा काही अठवड्यातच पंजाब संघात दाखल होणार आहेत.

पंजाब किंग्जचा वरिष्ठ अधिकारी याबाबत म्हणाला की, 'लिम लिव्हिंगस्टोनच्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत कोणतीही समस्या नाहीये. तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. तो पुढच्या आठवड्यात पंजाब किंग्जसोबत जोडला जाईल. रबाडा देखील आमच्याशी जोडला जाईन त्याच्याबाबत कोणताही दुखापतीची किंवा वर्कलोडची समस्या नाहीये.'

लिम लिव्हिंगस्टोनने डिसेंबर 2022 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो आपल्या दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी रिहॅब करतोय. जॉनी बेअरस्टोप्रमाणेच लिव्हिंगस्टोनला देखील इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून आयपीएल खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल.

दुसरीकडे कगिसो रबाडा नुकताच नेदलँडविरूद्धच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना दिला. तो या आठवड्याच्या सुरूवातीला भारतात दाखल झाला आहे. तो सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. हा सामना 9 एप्रिलला होणार आहे. रबाडाने गेल्या वर्षी पंजाबकडून 13 सामन्यात 23 विकेट्स घेतल्या होत्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT