Lucknow Super Giants vs Gujarat Titans  esakal
IPL

IPL 2024 LSG vs GT : यश ठाकूरचा पंजा, क्रुणाल पांड्याही चमकला; लखनौनं दिली गुजरातला मात

Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Scorecard Updates News : सुपर संडेमध्ये आज आयपीएल 2024 चा 21 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकना स्टेडियमवर खेळला गेला.

अनिरुद्ध संकपाळ

Lucknow Super Giants vs Gujarat Titans : लखनौ सुपर जायंट्सने ठेवलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संघ 130 धावातच गारद झाला. लखनौच्या यश ठाकूरने 30 धावात 5 विकेट्स घेत गुजरातच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. क्रुणाल पांड्याने देखील 3 विकेट्स घेत लखनौच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 31 धावा केल्या तर राहुल तेवतियाने 30 धावांचे योगदान दिले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सविरूद्ध 20 षटकात 165 धावा केल्या. मार्कस स्टॉयनिसने अर्धशतकी खेळी केली. तर निकोलस पूरनने 32 अन् केएल राहुलने 33 धावांचे योगदान दिले. गुजरात टायटन्सकडून उमेश यादव आणि दर्शन नाळकंडेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर राशिद खानने एक विकेट घेतली.

IPL 2024 LSG vs GT : यश ठाकूरचा पंजा; लखनौनं दिली गुजरातला मात

लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज यश ठाकूरने पाच विकेट्स घेत गुजरात टायटन्सला 130 धावात रोखलं लखनौनं पुन्हा एकदा होम ग्राऊंडवर टोटल डिफेंड करण्याचा कारनामा केला आहे.

IPL 2024 LSG vs GT Live Score : चांगल्या सुरूवातीनंतर गुजरातची गाडी घसरली; लखनौचे सामन्यात पुनरागमन

लखनौ सुपर जायंट्सचे 165 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सने 54 धावांची सलामी दिली. मात्र गिल 19 धावांवर बाद झाल्यानंतर गुजरातचा डाव गडगडला. क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई आणि यश ठाकूर यांनी गुजरातला पाठोपाठ धक्के देत त्यांची अवस्था 4 बाद 61 धावा अशी केली. त्यानंतर विजय शंकर आणि दर्शन नाळकंडेने संघाला 12 षटकात 80 धावांपर्यंत पोहचवलं.

IPL 2024 LSG vs GT Live Score : स्टॉयनिसचे अर्धशतक, गुजरातसमोर ठेवलं 165 धावांच आव्हान

मार्कस स्टॉयनिसने 43 चेंडूत 58 धावांची खेळी केली. तर निकोलस पूरनने 22 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. आयुष बदोनीने देखील 11 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. तर लखनौचा कर्णधार केएल राहुलने 31 चेंडूत 33 धावा केल्या. या जोरावर लखनौने 20 षटकात 5 बाद 165 धावा केल्या.

लखनौनं केलं शतक पार 

स्टॉयनिसच्या शतकी खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंटन्सने 14 व्या षटकात शतकी मजल मारली. स्टॉयनिसला साथ देणारा केएल राहुल 33 धावा करून बाद झाला. त्याला दर्शन नळकांडेने बाद केलं.

गुजरातनं लखनौला दिले दोन धक्के

गुजरात टायटन्सने पॉवर प्लेमध्ये दमदार गोलंदाजी करत लखनौला दोन धक्के दिले. उमेश यादवने सलामीवीर क्विंटन डिकॉक 6 तर देवदत्त पडिक्कलला 7 धावांवर बाद करत लखनौची अवस्था 3 षटकात 2 बाद 18 धावा अशी केली.

IPL 2024 LSG vs GT Live Score : लखनैने जिंकली नाणेफेक, सामना जिंकून गुजरातचं कोडं सोडवणार?

लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने आपल्या संघात एक बदल केला असून वृद्धीमान साहाच्या जागी स्पेन्सरला संधी मिळाली आहे.

IPL 2024 LSG vs GT Live Score : पुन्हा एकदा पाहिला मिळणार मयंक यादवचा कहर... किती वाजता दिसणार ॲक्शनमध्ये?

गुजरात टायटन्ससाठी मयंक यादवचे आव्हान असणार आहे. मयंक यादव 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आहे. यासोबतच त्याची लाईन लेंथही उत्कृष्ट आहे. गेल्या दोन सामन्यात तो सामनावीर ठरला आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाणार आहे, तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT