lsg vs rcb ipl 2022 eliminator 
IPL

IPL 2022 Eliminator: बंगळूर कोहलीच्या फॉर्ममुळे धोकादायक

एलिमिनेटर २ : लखनौला कामगिरी उंचावण्याची गरज

सकाळ ऑनलाईन टीम

LSG vs RCB IPL 2022 Eliminator: नाट्यमय घटनेनंतर प्लेऑफमध्ये मिळालेला प्रवेश आणि विराट कोहलीचा फॉर्म यामुळे बंगळूरचा संघ आता धोकादायक बनला आहे. आयपीएलमध्ये बुधवारी (ता. २५) एलिमिनेटर- २ लढतीत लखनौ सुपर जायंटस् संघाला अधिक दक्ष रहावे लागणार आहे.

या लढतीत हरणारा संघ बाद होणार आहे. त्यामुळे बंगळूर आणि लखनौला साखळी सामन्यातील कामगिरीचा विचार न करता नव्या आत्मविश्वासाने मैदानात उतरावे लागणार आहे. स्पर्धेतून बाद होण्याच्या मार्गावर असताना मुंबई संघाने दिल्लीचा पराभव केल्यामुळे प्लेऑफ खेळण्याची संधी मिळालेला बंगळूरचा संघ अधिक त्वेषाने मैदानात उतरू शकतो आणि लखनौसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकेल.

बुधवारचा हा सामना कौशल्याबरोबर कणखर मानसिकतेचाही असणार आहे. गुजरातविरुद्ध केलेली ५४ चेंडूतील ७३ धावांच्या खेळीमुळे विराट कोहलीच्या आत्मविश्वासात मोठा फरक पडला आहे. त्यानंतर मुंबई-दिल्ली सामना संपल्यानंतर केलेल्या जल्लोषामुळे विराट आणि त्याचे साथीदार बुधवारी अधिक तडफेने खेळ करू शकतात. दुसऱ्या बाजूला दोन आयपीएल विजेतेपद जिंकणारा गौतम गंभीर लखनौचा प्रशिक्षक आहे. तो अशा निर्णायक सामन्यात कसा खेळ करायचा, याची तयारी त्याने संघाकडून करून घेतली असणारच.

यंदाच्या आयपीएलमध्ये लखनौच्या कामगिरीचा आलेख सुरवातीला उंचावला होता. त्यानंतर मात्र त्यात सातत्य राहिले नव्हते. बंगळूरकडे एकापेक्षा एक सरस खेळाडू असले, तरी तळ्यात मळ्यात अशा अवस्थेनंतर प्लेऑफसाठीचे घोडे गंगेत नाहले होते. आता मात्र लखनौची बोट बुडवण्याची ताकद निश्चितच बाळगून असणार त्यासाठी तिघे मिळून ५७ विकेट मिळवणारे जोश हेझलवूड, वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल हे तीन गोलंदाज धोकादायक आहेत.

बंगळूरचा संघ तीन वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचला होता; पण एकदाही त्यांच्या हाती करंडक लागलेला नाही; यंदा त्यांचा कर्णधार फाफ डुप्लेसी तीन आयपीएल विजेत्या संघाचा खेळाडू राहिलेला आहे. त्यामुळे बाद फेरीच्या या निर्णायक सामन्यात तो संघाचे मनोबल उंचावू शकतो.

लखनौची मदार पुन्हा एकदा कर्णधार के.एल. राहुलवर असणार आहे; परंतु त्याला सातत्य राखता आलेले नाही. मात्र सलामीचा त्याचा साथीदर डिकॉक सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या तीन फलंदाजांमध्ये आहे. लखनौसाठी मधली फळी चिंतेची ठरत आहे. दिपक हुडाचा अपवाद वगळता, आयुष बदोनी, स्टॉयनिस, होल्डर यांना अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत.

दिनेश कार्तिकवर लक्ष

दिनेश कार्तिकची तुफानी टोलेबाजी यंदाच्या स्पर्धेत सर्वात चर्चेचा विषय ठरली आहे. बंगळूर संघाने त्याला अवघ्या ५.५० कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले; परंतु त्याचा खेळ बहुमोल किमतीचा ठरत आहे. त्याच जोरावर भारतीय संघात पुन्हा त्याची निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT