Amit Mishra SRH vs LSG Controversy : लखनौ सुपर जांयट्नसने सनराईजर्स हैदराबादचा 7 विकेट्स राखून पराभव करत आपले प्ले ऑफचे आव्हान अजून जिवंत ठेवले. मात्र लखनौ सुपर जांयट्सचा सामना आणि वाद हे समिकरण याही सामन्यात पहावयास मिळाले. आरसीबीच्या सामन्यावेळी लखनौच्या खेळाडूंनी जास्तच आक्रमकपणा दाखवला होता. त्यानंतर गंभीर आणि कोहली देखील सामन्यानंतर एकमेकांना भिडले.
हे प्रकरण ताजे असतानाच हैदराबाद विरूद्धच्या सामन्यावेळी देखील लखनौच्या खेळाडूंनी गरज नसताना आक्रमक हावभाव करत सामन्यातील वातावरण तापवले. लखनौचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राने सनराईजर्स हैदराबादचा सलामीवीर अनमोलप्रीत सिंगला झेलबाद केले. अमितने अनमोलप्रीतला कॉट अँड बॉल्ड केले. हा एक साधा झेल होता. मात्र त्यानंतरही अमित मिश्राने ज्या प्रकारे या विकेटचे सेलिब्रेशन केले त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावरून इतकं होऊनही लखनौची मस्ती गेली नसल्याचे दिसून आले.
फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर सनराईजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकात 40 धावा केल्या होत्या. यात अनमोलप्रीतने 36 धावांचे योगदान दिले होते. त्यामुळे अमित मिश्राने त्याची विकेट घेतल्यानंतर आनंद होणे सहाजिक आहे. मात्र सर्वसाधारण आंदन व्यक्त करता करता अमित मिश्राने चेंडू खेळपट्टीवर जोरात आपटला आणि अनमोलप्रीतकडे रागाने पाहू लागला.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर लखनौ सुपर जायंट्सने सनराईजर्स हैदराबादचे 183 धावांचे आव्हान 19.2 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. लखनौकडून प्रेरक मंकडने 64, मार्कस स्टॉयनिसने 40 तर निकोलस पूरनने 13 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले.
या विजयाबरोबरच लखनौ पॉवर प्लेच्या रेसमध्ये पुन्हा एकदा दाखल झाली आहे. ते आता 13 गुण घेत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहचवले आहे. त्यांचे नेट रनरेट +0.309 असून अजून त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.