Punjab Kings vs Lucknow Super Giants Esakal
IPL

IPL 2023: राहुल नंतर लखनऊला आणखी एक मोठा धक्का, आता या दिग्गजाने IPL ठोकला रामराम!

प्लेऑफ सामन्यांना काही दिवस उरले आहेत आणि तो वैयक्तिक कारणांमुळे गेला घरी...

Kiran Mahanavar

IPL 2023 Mark Wood : गेल्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सच्या अडचणी यंदा कमी होण्याचे नाव घेत नाहीत. संघाचा कर्णधार केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट दुखापतीमुळे 16 व्या हंगामाततून आधीच बाहेर गेले आहेत.

यानंतर आता एलएसजीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा प्रमुख इंग्लिश गोलंदाज मार्क वुड वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे. याची माहिती फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

आता आयपीएल 2023 च्या प्लेऑफ सामन्यांना काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत हे संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत व्यस्त आहेत. दरम्यान लखनौ सुपर जायंट्सचा घातक वेगवान गोलंदाज मार्क वुड संघ सोडून मायदेशी परतला आहे.

लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये वुड म्हणत आहे की, माझ्या मुलीच्या जन्मानिमित्त मला घरी जावे लागेल. हे एक चांगले कारण आहे ज्यासाठी मी जात आहे. आशा आहे की मी लवकरच पुनरागमन करेन आणि संघासाठी उर्वरित सामन्यांमध्ये खेळताना दिसेल.

संघाबाबत वुड पुढे म्हणाले की, एलएसजी हा एक उत्तम संघ आहे. मला हा संघ आवडतो. कोचिंग स्टाफही खूप चांगला आहे. मात्र मी फक्त चार सामने खेळलो आणि त्यात काही विकेट्स घेण्यात मला यश आले.

मार्क वुडने चालू हंगामात चांगली कामगिरी केली. त्याला केवळ 4 सामने खेळण्याची संधी मिळाली असली, तरी त्याने इतक्याच सामन्यांमध्ये 11 विकेट घेतल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वुडने 5 बळी घेत दिल्लीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते. त्याचे जाणे संघासाठी निश्चितच मोठा धक्का आहे आणि संघाला त्याची उणीव नक्कीच भासणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT