Sanjiv Goenka and KL Rahul: लखनौ सुपर जायंट्स संघाची कामगिरी आयपीएल 2024 स्पर्धेत संमिश्र झाली आहे. आता त्यांना 13 वा सामना मंगळवारी (14 मे) दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध खेळायचा आहे.दरम्यान, त्याआधी केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्या भेटीदरम्यानचे फोटो व्हायरल झाले आहेत.
गेल्या आठवड्यात त्यांना सनरायझर्स हैदाबादविरुद्ध लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. लखनौविरुद्ध हैदराबादने 167 धावांचे लक्ष्य 10 षटकांच्या आतच पूर्ण केले होते. यानंतर एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
या व्हिडिओमध्ये लखनौ संघाचे संघमालक संजीव गोयंका कर्णधार केएल राहुलवर भडकल्याचे दिसले होते. ते सामन्यात झालेल्या पराभवानंतर स्टेडियममध्येच केएल राहुलवर चिडल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या घटनेची प्रचंड चर्चा झाली होती. अनेकांनी गोयंका यांच्यावर टीका केली होती.
इतकेच नाही, तर केएल राहुलला लखनौच्या कर्णधारपदावरून हटवण्यात येऊ शकते, अशी चर्चा होती.
परंतु आता त्या घटनेनंतर सोमवारी गोयंका यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या घरी केएल राहुलबरोबर जेवणाबरोबर चर्चा (Dinner Meeting) केली असल्याचे समजत आहे. त्यांच्या भेटीदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
त्यामुळे देखील अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. काहींनी घडलेल्या घटनेनंतर केएल राहुलची भेट घेतल्याबद्दल संजीव गोयंकांचे कौतुक केले आहे, तर काहींना मात्र ही भेट पटलेली नाही. काही युजर्सचे म्हणणे आहे की 'एकदा गेलेला सन्मान परत नाही येत', तर काही युजर्सने म्हटले आहे की 'जे नुकसान व्हायचे होते ते होऊन गेले आहे'.
लखनौला प्लेऑफची संधी परंतु...
दरम्यान, लखनौने 12 सामन्यांमध्ये 6 विजय आणि 6 पराभव स्विकारले आहेत. त्यामुळे अद्याप त्यांचे प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग बंद झालेला नाही. परंतु, त्यांच्यासाठी प्लेऑफ गाठणे कठीण आहे.
त्यांनी जर उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तर त्यांना प्लेऑफ गाठता येऊ शकते, परंतु त्यांना इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागणार आहे. लखनौला दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर 17 मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना खेळायचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.