LSG vs DC IPL 2024  esakal
IPL

LSG vs DC : प्ले ऑफसाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक; केएल राहुल लखनौचं नेतृत्व करणार?

अनिरुद्ध संकपाळ

Lucknow Super Giants vs Delhi Capitals KL Rahul Sanjiv Goenka Controversy IPL 2024 : लखनौ सुपर जायंट्‌स‌ व दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये उद्या आयपीएल लढत रंगणार असून याप्रसंगी प्ले ऑफच्या दृष्टिने ही लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. दोन्ही संघांसमोर आता विजयाला पर्याय नाही. दिल्लीचा हा शेवटचा सामना असणार असून लखनौचे दोन सामने बाकी आहेत.

हैदराबादविरुद्धच्या लढतीत पराभूत झाल्यानंतर लखनौ संघाचा कर्णधार के. एल. राहुल याच्यावर लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका यांच्याकडून भर मैदानात टीका करण्यात आली. त्यामुळे आता लखनौ संघाच्या उर्वरित लढतींसाठी राहुलची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

के. एल. राहुल याने यंदाच्या आयपीएल मोसमात १२ सामन्यांमधून तीन अर्धशतकांसह ४६० धावा फटकावल्या आहेत. मात्र, तरीही लखनौचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर आहे. राहुलच्या फलंदाजी स्ट्राईक रेटवरूनही चौफेर टीका करण्यात येत आहे. त्याने या मोसमात १३६.०९च्या स्ट्राईक रेटने धावा केलेल्या आहेत. याचदरम्यान राहुलने भारताच्या टी-२० संघातील स्थानही गमावले आहे. राहुल लखनौ संघाचे कर्णधारपद सोडणार, अशी चर्चाही रंगू लागली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत त्याला उर्वरित लढतींमध्ये चमकदार खेळ करावाच लागणार आहे.

के. एल. राहुलसह क्विंटॉन डी कॉक या सलामीवीराच्या बॅटमधूनही धावा निघालेल्या नाहीत. त्यामुळे मार्कस स्टॉयनिस व निकोलस पूरन या मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव वाढत आहे. आयुष बदोनी या युवा फलंदाजाने मागील काही लढतींमध्ये चमक दाखवली आहे; पण उद्याच्या लढतीत सांघिक कामगिरीत यश मिळाल्यास लखनौला विजय मिळवता येणार आहे.

गोलंदाजी विभाग कमकुवत

युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव याने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली. त्यानंतर लखनौचा गोलंदाजी विभाग कमकुवत झाला आहे. मोहसिन खानही दुखापतीमुळे मागील सामन्यात खेळू शकलेला नाही. यश ठाकूर व नवीन उल हक यांना ठसा उमटवता आलेला नाही. कृणाल पंड्या व रवी बिश्‍नोई या फिरकीपटूंना गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे.

अखेरच्या सामन्यात विजयाची आशा

षटकांची गती न राखल्यामुळे एका सामन्याची बंदी लादण्यात आलेला रिषभ पंत उद्याच्या लढतीत दिल्ली संघाकडून पुनरागमन करताना दिसणार आहे. दिल्ली संघाचा हा शेवटचा सामना असणार आहे. या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल. अर्थात दिल्लीसाठी प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी कमी असणार आहे. त्यांचा नेट रनरेट इतर संघांच्या तुलनेत कमी आहे.

या खेळाडूंवर मदार

दिल्ली संघाची फलंदाजी विभागाची मदार रिषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, जेक फ्रेसर मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांच्यावर असणार आहे. तसेच अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, मुकेशकुमार या चार खेळाडूंना गोलंदाजीत प्रतिस्पर्ध्यांना रोखून ठेवावे लागणार आहे.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT