दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव करत आपला दुसरा विजय साजरा केला. दिल्लीने लखनौचे 167 धावांचे आव्हान 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 18.1 षटकात पार केलं. दिल्लीकडून जॅकने 55 तर ऋषभ पंतने 41 धावांची खेळी केली. पृथ्वी शॉने देखील संघाला दमदार सुरूवात करून देत 32 धावा केल्या होत्या.
तत्पूर्वी, दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या भेदक माऱ्यासमोर लखनौ सुपर जायंट्सची दाणादाण उडाली होती. मात्र आयुष बदोनीने नाबाद 55 धावांची खेळी करत अर्शद खानसोबत आठव्या विकेटसाठी नाबाद 73 धावांची खेळी केली अन् लखनौने 167 धावांपर्यंत मजल मारली.
दिल्ली कॅपिटल्सने आज लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पहिला पराभवाचा धक्का दिला. दिल्लीने लखनौचे 167 धावांचे आव्हान 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 19 व्या षटकात पार केलं. दिल्लीकडून जॅक फ्रासरे मॅगर्कने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. कर रिषभ पंतने 24 चेंडूत 41 धावा करत त्याला चांगली साथ दिली. पृथ्वी शॉने देखील 32 धावा करत चांगली सुरूवात करून दिली होती.
लखनौ सुपर जायंट्सचा फलंदाज आयुष बदोनीने 35 चेंडूत 55 धावांची अर्धशतकी खेळी करत लखनौला 167 अशा सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं. त्याला अर्शद खानने नाबाद 20 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 73 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली.
लखनौची अवस्था 7 बाद 94 धावा अशी झाली असताना आयुष बदोनीने झुंजार खेळी करत संघाला 18 व्या षटकात 150 धावांचा टप्पा पार करून दिला. त्याला अर्शद खानने तोलामोलाची साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.
कुलदीप यादवने आठव्या षटकात लखनौचे दोन तगडे फलंदाज बाद केल्यानंतर त्यानं होम टीमला अजून एक तगडा झटका दिला. 39 धावा करून खेळणाऱ्या केएल राहुलला बाद करत कुलदीपने आपली तिसरी शिकार केली. यानंतर इशांत शर्मा, मुकेश कुमार यांनी अजून दोन धक्के देत लखनौची अवस्था 13 षटकात 7 बाद 94 अशी केली.
पॉवर प्लेमध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सला कुलदीप यादवनं वेसन घातलं. त्यानं आठव्या षटकात लखनौच्या स्टॉयनिस आणि निकोलस पूरन या दोन धडाकेबाज फलंदाजांना बाद करत लखनौची अवस्था 2 बाद 66 धावांवरून 4 बाद 66 धावा अशी केली.
लखनौ सुपर जायंट्सने 6 षटकात 2 बाद 57 धावा केल्या. डिकॉक 19 आणि देवदत्त पडिक्कल 3 धावांवर बाद झाल्यानंतर राहुलने डाव सावरला अन् संघाला अर्धशतक पार पोहचवले
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. डिफेंड करण्यात हातखंडा असलेल्या लखनौने पुन्हा एकदा धावा डिफेंड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीसमोर आता लखनौला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचं आव्हान असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.