LSG vs GT IPL 2023 esakal
IPL

LSG vs GT IPL 2023 : राहुलचे अर्धशतक वाया, गुजरातने गेलेला सामना आणला खेचून

अनिरुद्ध संकपाळ

LSG vs GT IPL 2023 Live : आयपीएलच्या 30 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने ठेवलेल्या 136 धावांचा पाठलाग करताना लखनौने 15 षटकात 2 बाद 106 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र शेवटच्या पाच षटकात लखनौला 5 फलंदाज गमवूनही साध्या 30 धावा निघाल्या नाहीत. कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 68 धावा केल्या. मात्र यासाठी त्याने 61 चेंडू खाल्ले. गुजरातने सामना अखेरच्या षटकापर्यंत खेचला अन् शेवटच्या षटकात 12 धावांची गरज असताना अनुभवी मोहित शर्माने फक्त 4 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. लखनौचे 2 फलंदाज याच षटकात धावबाद देखील झाले. लखनौने जिंकलेला सामना 7 धावांनी गमवला.

तत्पूर्वी, लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार हार्दिक पांड्याने 50 चेंडूत 66 धावांची दमदार खेळी केली. तर सलामीवीर वृद्धीमान साहाने 47 धावा करत मोलाचे योगदान दिले. मात्र साहा आणि पांड्याने चांगली सुरूवात करून देखील मधल्या षटकांमध्ये गुजरातची गाडी अडली होती. त्यांना 16 षटके झाली तरी शतक पार करता आले नाही. अखेर हार्दिक पांड्याने आपला गिअर बदलला आणि गुजरातचा जीव भांड्यात पडला.

128-7 (20 Ov) : केएल राहुलची संथ खेळी पडली महागात

केएल राहुलने लखनौसाठी 68 धावांची खेळी केली. मात्र ही खेळी लखनौच्याच मुळावर आली. आधी चांगल्या धावगती धावा करणारा केएल राहुल नंतर संथ पडला. त्यामुळे गुजरातला सामना शेवटच्या षटकापर्यंत नेण्यात यश आले. शेवटच्या षटकात 12 धावांची गरज असताना मोहित शर्माने फक्त 4 धावा देत दोन विकेट्स मिळवल्या तसेच लखनौचे दोन फलंदाज धावबाद देखील झाले. गुजरातने सामना 7 धावांनी जिंकला.

केएल राहुलची दमदार फलंदाजी

गुजरात टायटन्सने लखनौ समोर विजयासाठी 136 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर फलंदाजीला आलेल्या केएल राहुल आणि कायल मेयर्स यांनी 6 षटकात 53 धावा करत दमदार सुरूवात केली. मात्र ही जोडी राशिद खानने फोडली. त्याने मेयर्सला 24 धावांवर बाद केले. त्यानंतर केएल राहुलने क्रुणाल पांड्याच्या साथीने संघाला

हार्दिकने गिअर बदलला

अखेर बॉल टू रन खेळणाऱ्या हार्दिक पांड्याने शेवटची काही षटके शिल्लक राहिले अशताना आपला गिअर बदलला. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला 125 धावांच्या जवळ पोहचवले. मात्र 20 व्या षटकात तो 50 चेंडूत 66 धावा करून बाद झाला. त्यानंतर गुजरातने 20 षटकात 6 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली.

GT 97/4 (16) : गुजरातची अवस्था झाली बिकट

वृद्धीमान साहा 47 धावांवर बाद झाल्यानंतर आलेला अभिनव मनोहर 3 धावांची भर घालून परतला. त्याला अमित मिश्राने बाद केले. तर नवीन उल हकने विजय शंकरला 10 धावांवर बाद केले. दरम्यान, गुजरातची धावगती देखील मंदावली. 16 षटके झाली तरी गुजरातला शंभरी पारी करता आली नव्हती. हार्दिक पांड्या देखील बॉल टू रन खेळत होता.

GT 72/2 (10.3) : साहाचे अर्धशतक हुकले

वृद्धीमान साहाला कृणाल पांड्याने 47 धावांवर बाद केले. साहाचे अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकले. पांड्याने साहा आणि हार्दिकची दुसऱ्या विकेटसाठीची 68 धावांची भागीदारी तोडत आपली दुसरी शिकार केली.

GT 71/1 (10)  : हार्दिकनेही गिअर बदलला

पॉवर प्लेमध्ये वृद्धीमान साहाने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यानंतर हार्दिक पांड्याने आपला गिअर बदलला. त्याने साहासोबतची भागीदारी अर्धशतक पार पोहचवत संघाला 10 षटकात 70 धावांचा टप्पा पार करून दिला.

GT 39/1 (6) : गुजरातची आक्रमक सुरूवात

लखनौ सुपर जायंट्सचा डावखुरा फिरकी गोलंदाज क्रुणाल पांड्याने दुसऱ्याच षटकात गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलला शुन्यावर बाद करत मोठा धक्का दिला होता. मात्र त्यानंतर वृद्धीमान साहा आणि हार्दिक पांड्याने गुजरातला आक्रमक सुरूवात करून दिली. यात साहाचा मोठा वाटा होता. त्यांनी पॉवर प्लेमध्ये गुजरातला 39 धावांपर्यंत पोहचवले. यात 34 धावांचे योगदान एकट्या वृद्धीमान साहाचे होते.

गुजरातने नाणेफेक जिंकली. 

गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT