SRH vs LSG No Ball Controversy Gautam Gambhir : लखनौ सुपर जांयट्सचा मेंटॉर गौतम गंभीरने विराट कोहलीशी पंगा घेऊन हात दाखून अवलक्षण करून घेतल्यातला प्रकार झाला आहे. कारण लखनौच्या स्टेडियमवर झालेल्या या राड्यात लखनौच्या चाहत्यांनी गंभीरला साथ दिली नाही. तसेच देशभरातील इतर स्टेडियमवरील चाहते देखील गंभीरला डिवचण्याची एक संधी सोडत नाहीयेत. आता हैदराबादविरूद्धच्या सामन्यात देखील हैदराबादी चाहत्यांनी गौतम गंभीरला विराट कोहलीच्या घोषणा देत डिवचले. याचबरोबर काही प्रेक्षकांनी तर लखनौच्या डगआऊटच्या दिशेने काही वस्तू फेकल्या. त्यामुळे काही काळ सामना थांबला देखली होता.
हे प्रकरण सुरू झाले ते 19 व्या षटकात! लखनौ सुपर जायंट्सच्या आवेश खानने दमदार फलंदाजी करणाऱ्या हैदराबादचा फलंदाज अब्दुल समादला एक फुलटॉस चेंडू टाकला. हा चेंडू त्याच्या कंबरेच्या वरच्या बाजूला असल्याने मैदानावरील अंपायरनी हा नो बॉल दिला. मात्र या निर्णयाविरूद्ध लखनौने आक्षेप घेत डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये चेंडू क्लासेनच्या कंबरेच्यावर जात आहे असे दिसत असतानाही थर्ड अंपायरने हा वैध चेंडू ठरवला. त्यामुळे मैदानावरील वातावरण थोडं तापलं. क्लासेननेही अंपायर्सशी हुज्जत घातली.
क्लासेननेही या निर्णयाविरूद्ध नराजी व्यक्त केली. मात्र तोपर्यंत लखनौ सुपर जायंट्सच्या डगआऊटच्या दिशेला काही गोंधळ सुरू झाला. सनराईजर्स हैदराबादच्या चाहत्यांनी या निर्णयाविरूद्ध नाराजीचा सूर लावला. हा सूर लगावताना काही चाहत्यांना हद्द पार केली. त्यामुळे सामना काही काळ थांबला. सध्या सोशल मीडियावर याचबाबतचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत हैदराबादचे चाहते गौतम गंभीरला पाहून विराट कोहलीच्या नावाच्या घोषणा देत असताना दिसत आहेत.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले. हैदराबादकडून हेन्री क्लासनने 47 धावांची अब्दुल समादने नाबाद 37 धावांची खेळी केली. सलामीवीर अनमोलप्रीतनेही 36 धावांचे योगदान दिले. लखनौकडून कृणाल पांड्याने 2 विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.