KL Rahul Impact Player: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 11 वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळवला जाणार आहे. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी (30 मार्च) खेळवला गेला. या सामन्यात लखनौने 21 धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, या सामन्यात लखनौचे नेतृत्व नियमित कर्णधार केएल राहुलने केले नाही, तर निकोलस पूरनने केले. केएल राहुल या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला. इम्पॅक्ट प्लेअरचा नियम गेल्या वर्षापासून आयपीएलमध्ये सुरू झाला आहे.
दरम्यान, कर्णधाराने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणे हे फारसे आत्तापर्यंत पाहाण्यात आलेले नाही. गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे काही सामने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला होता.
दरम्यान, शनिवारी झालेल्या सामन्यात केएल राहुल केवळ फलंदाज म्हणून खेळला. त्याची जागा दुसऱ्या डावात नवीन-उल-हकने प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतली. तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार असल्याचे नाणेफेकीवेळीच प्रभारी कर्णधार निकोलस पूरनने सांगितले होते.
त्याने सांगितले होते की 'केएलने नुकतेच दुखापतीतून पुनरागमन केले आहे. आम्ही त्याला या मोठ्या स्पर्धेत काही काळ विश्रांची देण्याचा विचार करत आहोत. पण तो या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल. प्रत्येकाने मिळालेल्या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि चांगली कामगिरी केली पाहिजे.'
खंरतर गेल्यावर्षी आयपीएलमध्येच झालेल्या दुखापतीनंतर केएल राहुलच्या मांडीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमनही केले होते.
परंतु, फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्याला पुन्हा मांडीच्या दुखापतीचा त्रास झाल्याने तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या चार सामन्यांनाही मुकला. त्यानंतर त्याने पुन्हा आयपीएल 2024 मधून क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
दरम्यान, केएल राहुलला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्याचा निर्णय लखनौ सुपर जायंट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी घेतला होता. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले की 'केएल राहुल पूर्ण तंदुरुस्त आहे आणि पूर्ण उत्साही आहे. हा प्रशिक्षकाने घेतलेला निर्णय आहे.'
तसेच असेही समजत आहे की लखनऊच्या वरच्या फळीत केएल राहुल हाच एक चांगला पर्याय होता, ज्याच्या जागेवर नंतर एक प्रमुख गोलंदाज खेळवला जाऊ शकत होता. कारण त्यांच्या संघातील क्विंटन डी कॉक हा यष्टीरक्षण करू शकतो.
तसेच मार्कस स्टॉयनिस, आयुष बडोनी आणि कृणाल पंड्या हे गोलंदाजी करू शकतात, तर पूरन हा एक उत्तम क्षेत्ररक्षक आहे. त्यामुळे केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल हे इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय होते.
पण पडिक्कलही चांगला क्षेत्ररक्षक आहे. त्यातच केएल राहुल पुनरागमन करत असल्याने त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवणे लखनौसाठी सर्वोत्तम पर्याय होता. हाच विचार लँगर यांनीही केला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.