IPL 2024 CSK vs LSG  sakal
IPL

IPL 2024 CSK vs LSG : मार्कस स्टॉयनिसचा शतकी उलटवार ; लखनौचा चेन्नईवर सनसनाटी विजय

मार्क स्टॉयनिसने ६३ चेंडूंमध्ये नाबाद १२४ धावांची संस्मरणीय खेळी साकारताना लखनौ सुपरजायंटस्‌ संघाला चेन्नई सुपरकिंग्स संघावर सहा विकेट व तीन चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवून दिला.

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : मार्क स्टॉयनिसने ६३ चेंडूंमध्ये नाबाद १२४ धावांची संस्मरणीय खेळी साकारताना लखनौ सुपरजायंटस्‌ संघाला चेन्नई सुपरकिंग्स संघावर सहा विकेट व तीन चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत तेरा चौकार व सहा षटकारांचा पाऊस पाडला. लखनौचा हा आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पाचवा विजय ठरला. चेन्नईला चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. लखनौने चेन्नईवर या मोसमात दोन सामन्यांत मात केली.

चेन्नईकडून लखनौसमोर २११ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. दीपक चहरे क्विंटॉन डी कॉक याला शून्यावरच बाद करीत लखनौला बॅकफूटवर ढकलले. कर्णधार के. एल. राहुलला मोठी खेळी करता आली नाही. मुस्तफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो ॠतुराजकरवी झेलबाद झाला. यानंतर मार्कस स्टॉयनिस व देवदत्त पडिक्कल जोडीने ५५ धावांची भागीदारी रचली. ही जोडी धावफलक पुढे नेत होती. मथिशा पथिरानाने स्वत:च्या पहिल्याच षटकात देवदत्तला (१३ धावा) त्रिफळाचीत केले व जोडी तोडली.

मार्कस स्टॉयनिस व निकोलस पूरन या जोडीने लखनौच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दोघांनी ७० धावांची शानदार भागीदारी रचली. दोघांच्या झंझावातापुढे चेन्नईचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. मथिशा पथिराना पुन्हा चेन्नईसाठी धावून आला. त्याने निकोलसला ३४ धावांवर शार्दुल ठाकूरकरवी झेलबाद केले. त्यानंतर स्टॉयनिसने स्वबळावर लखनौला देदीप्यमान विजय मिळवून दिला. नाबाद १२४ धावांची खेळी साकारणाऱ्या स्टॉयनिसला दीपक हुडाने नाबाद १७ धावांची खेळी करीत उत्तम साथ दिली.

लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मॅट हेन्‍री याने अजिंक्य रहाणेला एक धावेवर बाद करीत चेन्नईला पहिला धक्का दिला. ॠतुराज गायकवाड व डॅरेल मिचेल या जोडीने ४५ धावांची भागीदारी करताना धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. यश ठाकूरच्या गोलंदाजीवर मिचेल ११ धावांवर बाद झाला. ॠतुराज व रवींद्र जडेजा या जोडीने ५२ धावांची भागीदारी करीत चेन्नईला शंभरी ओलांडून दिली. मोहसिन खान याने आखूड टप्प्याच्या चेंडूवर जडेजाला १७ धावांवर यष्टिरक्षक के. एल. राहुलकरवी झेलबाद केले.

१०४ धावांची धडाकेबाज भागीदारी
ॠतुराज गायकवाड - शिवम दुबे या महाराष्ट्राच्या शिलेदारांनी चेन्नईसाठी खेळताना १०४ धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. ॠतुराजने ६० चेंडूंचा सामना बारा चौकार व तीन षटकारांसह नाबाद १०८ धावांची खेळी केली. शिवम दुबेने आपला दमदार फॉर्म या लढतीतही कायम राखला. त्याने अवघ्या २७ चेंडूंमध्ये तीन चौकार व सात षटकारांचा पाऊस पाडत ६६ धावांची फटकेबाजी केली. तो धावचीत बाद झाला. चेन्नईने २० षटकांत चार बाद २१० धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपरकिंग्स - २० षटकांत चार बाद २१० धावा (ॠतुराज गायकवाड नाबाद १०८ - ६० चेंडू, १२ चौकार, ३ षटकार, शिवम दुबे ६६ - २७ चेंडू, ३ चौकार, ७ षटकार) पराभूत वि. लखनौ सुपरजायंटस्‌ १९.३ षटकांत ४ बाद २१३ धावा (मार्कस स्टॉयनिस नाबाद १२४ - ६३ चेंडू, १३ चौकार, ६ षटकार, निकोलस पूरन ३४, दीपक हूडा नाबाद १७).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT