matheesha pathirana 
IPL

CSK IPL 2023 : कोटींची किंमत मिळालेल्या खेळाडूंनाही वरचढ ठरला 20 लाखांचा खेळाडू, धोनीचाही जिंकलाय विश्वास

Kiran Mahanavar

IPL 2023 Matheesha Pathirana : आयपीएल-2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आपल्या जुन्या रंगात दिसत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ यावेळी गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

चेन्नईने सातपैकी पाच सामने जिंकले आहेत, तर दोनमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. पण कोटींची किंमत मिळालेल्या खेळाडूंनाही वरचढ ठरत केवळ 20 लाखांचा खेळाडू चमकला आहे.

चेन्नईने त्यांचा स्टार खेळाडू दीपक चहरसाठी 14 कोटी रुपये दिले पण तो मोसमाच्या मध्यभागी जखमी झाला आणि आता तो बेंचवर बसला आहे. त्याचवेळी चेन्नईने बेन स्टोक्ससाठी 16.25 कोटी रुपये खर्च केले. स्टोक्सलाही दुखापत झाली असून तो सध्या बाहेर आहे.

दीपक आणि स्टोक्समुळे संघाची गोलंदाजी मजबूत झाली असती पण ते दोघेही खेळत नाहीत. त्याचवेळी 20 वर्षीय मथिसा पाथीराना या दोघांची जागा भरताना दिसत आहे. या युवा गोलंदाजाने चेन्नईसाठी अप्रतिम गोलंदाजी करत सामने जिंकून दिले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या महत्त्वाच्या वेळी त्याने शेवटचे षटक टाकले आणि चेन्नईला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात बंगळुरूला विजयासाठी 19 धावांची गरज होती.

धोनीने पाथीरानाला ओव्हर दिली आणि तो कर्णधाराच्या विश्वासावर खरा राहिला. त्याने संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने चार षटकात 42 धावा देत दोन विकेट घेतल्या.

पाथिरानाची लसिथ मलिंगासारखी हूबेहूब बॉलिंग आहे. त्यामुळे त्याला खेळवणे फलंदाजांसाठी थोडे कठीण जाते. पाथीरानाला त्याच्या चेंडूंनी धावा कशा रोखायच्या हे देखील माहीत आहे.

या मोसमात पाथीरानाने आपला दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने 4 षटकात 22 धावा देत एक विकेट घेतली.

त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही शानदार गोलंदाजी करत कमी धावा दिल्या. त्याने चार षटकात 27 धावा देत एक विकेट घेतली.

या मोसमात आतापर्यंत पाथीरानाने एकूण तीन सामने खेळले असून चार विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे. आपल्या गोलंदाजीने त्याने धोनीचा विश्वास जिंकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT