Mayank Yadav | IPL 2024 | RCB vs LSG Sakal
IPL

Mayank Yadav Video: मयंकच्या वेगानं RCB चे फलंदाज गारद! 156.7kph स्पीडचा बॉल टाकत रचला नवा विक्रम

IPL Fastest Ball: मयंक यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या वेगानं अनेक दिग्गजांनाही प्रभावित केलं असून आता त्याने ताशी 156.7 किमी वेगात चेंडू टाकत नवा विक्रम रचला आहे.

Pranali Kodre

Mayank Yadav Bowling: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 15 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात मंगळवारी (२ एप्रिल) पार पडला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात लखनऊने 28 धावांनी विजय मिळवला.

लखनऊच्या या विजयात 21 वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादवने मोलाचा वाटा उचलला. याशिवाय त्याने आपल्या वेगाने मोठमोठ्या दिग्गजांना प्रभावित, तर केलेच पण मोठा विक्रमही केला. त्याने तीनच दिवसात स्वत:चाच विक्रमही मोडला.

हा मयंकचा आयपीएलमधील दुसराच सामना होता. त्याने पहिल्या सामन्याप्रमाणेच याही सामन्यात सातत्याने ताशी 150 किमी वेगाने त्याने गोलंदाजी केली.

विशेष म्हणजे त्याने या सामन्यात एक चेंडू ताशी 156.7 च्या वेगाने टाकला. त्यामुळे तो आता आयपीएल इतिहासात सर्वात वेगात चेंडू फेकणारा चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.

त्याने एन्रिच नॉर्कियाला याबाबत मागे टाकले आहे. नॉर्कियाने 2020 मध्ये दिल्लीकडून खेळताना ताशी 156.2 किमी वेगाने एक चेंडू टाकला होता. आता त्याच्या याच विक्रमाला मयंकने मागे टाकले आहे.

तसेच मयंक आयपीएलमध्ये सर्वात वेगात चेंडू टाकणारा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. उमरान मलिकने आयपीएलमध्ये ताशी 157 किमी वेगात गोलंदाजी केली आहे.

आयपीएल इतिहासात सर्वात वेगात चेंडू टाकणारे गोलंदाज

  • ताशी 157.7 किमी - शॉन टेट

  • ताशी 157.4 किमी - लॉकी फर्ग्युसन

  • ताशी 157 किमी - उमरान मलिक

  • ताशी 156.7 किमी - मयंक यादव

  • ताशी 156.2 किमी - एन्रिच नॉर्किया

आयपीएल 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू

मयंकचा हा आयपीएल 2024 मधील सर्वात वेगवान चेंडूही ठरला आहे. विशेष म्हणजे त्याने तीनच दिवसांपूर्वी केलेला त्याचा हा विक्रम मोडला आहे. त्याने 30 मार्च रोजी पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना ताशी 155.8 किमी वेगाने चेंडू टाकला होता.

मयंकची भेदक गोलंदाजी

दरम्यान, मंगळवारी मयंकने ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन आणि रजत पाटीदार यांना बाद केले. त्याने 4 षटकात अवघ्या 14 धावाच देत या तिघांच्या विकेट्स घेतल्या.

त्यामुळे 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बेंगळुरूच्या संघाला 19.4 षटकात 153 धावांवरच रोखण्यात लखनऊला यश मिळाले. दरम्यान, बेंगळुरूचा संघ यंदाच्या हंगामात सर्वबाद होणारा पहिलाच संघ ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT