Mayank Yadav | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024: 'कुठे लपला होतास?', 155.8kph वेगात बॉल टाकणाऱ्या मयंकवर डेल स्टेन, ब्रेट ली देखील खूश, पाहा कोण काय म्हणालं

Mayank Yadav: IPL 2024 मधील सर्वात वेगावान बॉल टाकणाऱ्या मयंक यादववर डेल स्टेन, ब्रेटलीसह दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

Pranali Kodre

Mayank Yadav in IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 11 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सविरुद्ध 21 धावांनी विजय मिळवला. यासह लखनौने या हंगामातील पहिल्या विजयाची घरचे मैदान एकाना स्टेडियमवर नोंद केली.

लखनौच्या या विजयात 21 वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादवने मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात त्याचा वेग हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.

या सामन्यात त्याने सातत्याने ताशी 140 ते 155 किमी वेगाने गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजांना भांडावून सोडले. त्याने या सामन्यात 4 षटकांमध्ये 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.  

त्याने पंजाबचा कर्णधार शिखर धवनविरुद्ध ताशी 155.8 किमी वेगाने चेंडू फेकला. हा यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडूही ठरला. विशेष म्हणजे याच सामन्यातून मयंकने आयपीएलमध्ये पदार्पणही केले, तसेच सामनावीर पुरस्कारही जिंकला.

दरम्यान, या सामन्यात त्याने दाखवलेल्या वेगाने अनेक दिग्गज खेळाडूंना प्रभावित केले आहे. त्याचे ब्रेट ली, केविन पीटरसन, लिसा स्थळेकर, टॉम मुडी, डेल स्टेन, इरफान पठाण, वासिम जाफर, रॉबिन उथप्पा अशा अनेक दिग्गजांनी कौतुक केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने पोस्ट केले की भारताला त्यांचा वेगवान गोलंदाज सापडला आहे. मयंक यादव! नैसर्गिक वेग, खूपच प्रभावशाली.'

याशिवाय स्टेनगन म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने पोस्ट केले की 'ताशी 155.8 किमी! मयंक यादव तू इतके दिवस कुठे लपलेला होता?'

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने लिहिले की 'मयंक यादव काय प्रतिभा आहे. (वेग 156) त्याला गोलंदाजी करताना पाहून छान वाटले आणि त्याला तो अजून खेळत राहावा आणि भारतासाठीही खेळावा, यासाठी शुभेच्छा.'

इरफान पठाणनेही लखनौ संघाचे मयंकला शोधल्याबद्दल कौतुक केले आहे. याशिवाय देखील अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे.

या सामन्यात पंजाबकडून 200 धावांचा पाठलाग करताना कर्णधार शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी सलामीला आक्रमक फलंदाजी केली होती. त्यांनी 11 षटकातच 102 धावांची भागीदारी केली होती.

मात्र ही जोडी मयंकनेच तोडली. त्याने बेअरस्टोला 42 धावांवर बाद केले. त्यानंतर त्याने 7 चेंडूत 19 धावा करणाऱ्या प्रभसिमरन सिंगला बाद केले, तर जितेश शर्मालाही त्यानेच बाद केले.

त्यामुळे त्याचा स्पेल लखनौला सामन्यात पुन्हा परत आणण्यासाठी महत्त्वाचा ठरला. पंजाबला नंतर 20 षटकात 5 बाद 178 धावाच करता आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT