MI vs CSK IPL 2024 MS Dhoni News Marathi sakal
IPL

IPL 2024 : MI की CSK कोण गाजवणार मैदान... वानखेडे स्टेडियमवर शेवटचा खेळताना दिसणार MS धोनी?

Mumbai Indians vs Chennai Super Kings : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपरकिंग्स यांच्यामध्ये आयपीएलची साखळी फेरीची लढत रंगणार आहे; मात्र चर्चा महेंद्रसिंग धोनीच्या नावाचीच सुरू आहे. सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या आहेत.

Kiran Mahanavar

Mumbai Indians vs Chennai Super Kings playing XI : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपरकिंग्स यांच्यामध्ये आयपीएलची साखळी फेरीची लढत रंगणार आहे; मात्र चर्चा महेंद्रसिंग धोनीच्या नावाचीच सुरू आहे. सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या आहेत.

भारतीय संघाचा तसेच चेन्नई सुपरकिंग्सचा माजी कर्णधार म्हणून ओळखला जाणाऱ्या धोनीची वानखेडे स्टेडियमवरील ही अखेरची लढत असण्याची दाट शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा येथील खेळपट्टीवर धावांचा डोंगर उभा राहील, हे जवळपास निश्‍चित आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारचा दिवस मुंबई - चेन्नई यांच्यातील स्पेशल लढतीने गाजणार, हे पक्के आहे.

महेंद्रसिंग धोनी आता चेन्नई संघाचा कर्णधार नाही. तो कोणत्याही संघाचा कर्णधार नसताना २००५नंतर पहिल्यांदाच वानखेडे स्टेडियवर खेळताना दिसणार आहे. वयाच्या ४२व्या वर्षीही तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. चेन्नईचा संघ गतविजेता आहे; मात्र यंदाच्या आयपीएल मोसमात चेन्नईच्या संघाला बाहेरच्या मैदानांवर पराभवाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईविरुद्धच्या लढतीत हा मालिका खंडित करण्यासाठी चेन्नईचा संघ प्रयत्न करताना दिसणार आहे.

पाहुण्यांचे पारडे जड

चेन्नई व मुंबई या दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकताना वर्चस्व अधोरेखित केले आहे. या दोन्ही संघांचा आयपीएलच्या इतिहासातील दबदबा सर्वश्रुत आहे; पण या दोन संघांमधील मागील पाच लढतींच्या निकालावर लक्ष टाकता पाहुण्या चेन्नईचे पारडे जड आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चेन्नई संघाने पाचपैकी चार लढतींमध्ये विजय संपादन केले आहेत. मागील मोसमात वानखेडे स्टेडियमवरही त्यांनी विजय मिळवला आहे. यामुळे चेन्नई संघाचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला असेल.

स्टार फलंदाजांची फौज

मुंबईच्या संघाला यंदाच्या मोसमात छान सुरुवात करता आली नाही. पहिल्या तीन लढतींत पराभवाचा सामना करावा लागला; पण दिल्ली व बंगळूर या दोन संघांविरुद्ध त्यांनी विजय मिळवताना झोकात पुनरागमन केले आहे. आता ही विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी मुंबईचा संघ जीवाचे रान करताना दिसेल. इशान किशन (१६१ धावा), रोहित शर्मा (१५६ धावा) हे सलामी फलंदाज फॉर्ममध्ये आहेत; पण मोठी खेळी त्यांना करता आलेली नाही. तिलक वर्माकडून मधल्या फळीत मोठ्या अपेक्षा आहेत. सूर्यकुमार यादवने बंगळूरविरुद्धच्या लढतीत वादळी खेळी साकारली. यामुळे त्याच्यासह संघ व्यवस्थापनाने सुटकेचा नि:श्‍वास टाकला असेल. टीम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड यांच्याकडून सामन्याला कलाटणी देणाऱ्या खेळीची अपेक्षा करता येऊ शकते. मुंबईकडे अव्वल दर्जाच्या फलंदाजांची फौज आहे.

हार्दिक पंड्याचे अपयश

रोहित शर्माऐवजी कर्णधारपद देण्यात आलेल्या हार्दिक पंड्याला सुरुवातीपासून ट्रोलचा सामना करावा लागत आहे. अहमदाबादपासून मुंबईपर्यंत त्याच्यावर सर्वच ठिकाणी टीका होत आहे. अशा परिस्थितीत त्याच्या बॅटमधून धावाही निघालेल्या नाहीत. पाच सामन्यांमधून त्याला फक्त १२९ धावाच करता आलेल्या आहेत. हार्दिकने फलंदाजी फॉर्मकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बुमरावगळता सुमार गोलंदाजी

मुंबईचा गोलंदाजी विभाग एकट्या जसप्रीत बुमरावर अवलंबून आहे. त्याने पाच सामन्यांमधून दहा विकेट मिळवल्या आहेत. तसेच या दरम्यान त्याने फक्त ५.९५च्या सरासरीने धावा दिलेल्या आहेत; पण मुंबई संघातील इतर गोलंदाज अपयशी ठरले आहेत. जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल, पीयूष चावला यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

रहाणे, शिवम, शार्दुल, तुषार घरच्या मैदानावर खेळणार

चेन्नई संघातील चार खेळाडू आज घरच्या मैदानावर खेळणार आहेत. अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर व तुषार देशपांडे हे चारही खेळाडू मुंबईचे आहेत. त्यांना वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीचे चांगले ज्ञान आहे. याचा फायदा चेन्नईला घेता येणार आहे. ॠतुराज गायकवाड व शिवम दुबे यांनी आतापर्यंत चमकदार फलंदाजीही केली आहे. राचिन रवींद्र व रवींद्र जडेजाकडून फलंदाजीत आणखीन छान कामगिरी करण्याची आशा बाळगली जात आहे. मुस्तफिजूर रहमान, जडेजा, मथिशा पथिराना, दीपक चहर, माहिश तीक्षणा यांना मुंबईच्या फलंदाजांना रोखावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT