चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा त्यांच्याच होम ग्राऊंडवर 20 धावांनी पराभव केला. मुंबईकडून रोहित शर्माने 105 धावांची शतकी खेळी केली. मात्र तरी देखील चेन्नईच्या 207 धावांचे आव्हान पार करताना मुंबईला 20 षटकात 6 बाद 186 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून पथिरानाने भेदक मारा करत 4 षटकात 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर तुषार आणि मुस्तफिजूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 207 धावांचे आव्हान ठेवले. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबईने सुरूवातीला चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला होता. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाड (69 धावा) आणि शिवम दुबे (नाबाद 66 धावा) यांनी डावाला गती देत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचली. या दोघांच्या खेळीमुळे सीएसके 180 ते 190 धावांपर्यंत पोहचेल असं वाटत होतं. मात्र त्यानंतर शेवटच्या षटकात धोनीने 4 चेंडूत नाबाद 20 धावा ठोकल्या अन् चेन्नईला 206 धावांपर्यंत पोहवचलं.
रोहित शर्माने 63 चेंडूत 105 धावांची शतकी खेळी केली. मात्र ही शतकी खेळी वाया गेली. चेन्नई सुपर किंग्जने सामना 20 धावांनी जिंकत गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. चेन्नईकडून पथिरानाने भेदक मारा करत 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जच्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या 6 षटकात 63 धावा चोपल्या. यात रोहितच्या 42 तर इशान किशनच्या 21 धावांचे योगदान होते.
डॅरेल मिचेल 14 चेंडूत 17 धावा करून बाद झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी शेवटचं षटक खेळण्यासाठी आला. त्याच्या वाट्याला शेवटचे चार चेंडू आले होते. त्यातही त्याने हार्दिकच्या गोलंदाजीवर तीन षटकार आणि दोन धावा घेत 20 धावा कुटल्या. त्यामुळे सीएसकेने 20 षटकात 4 बाद 207 धावा केल्या.
ऋतुराज गायकवाडने 40 चेंडूत 69 धावांची खेळी करत शिवम दुबेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचली होती. या दोघांनी 16 व्या षटकात सीएसकेला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र ही जोडी कर्णधार हार्दिक पांड्यानं फोडली. त्याने ऋतुराजला 69 धावांवर बाद केलं.
ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. ऋतुराजने अर्धशतक ठोकलं तर शिवम दुबे त्याला फटकेबाजी करत चांगली साथ देतोय. या दोघांनी सीएसकेला 14 षटकात 2 बाद 132 धावांपर्यंत पोहचवलं.
चेन्नईने आज आपल्या सलामी जोडीत बदल केला होता. अजिंक्य रहाणे सलामीला तर ऋतुराज तिसऱ्या क्रमांकावर आला. रहाणे स्वस्तात बाद झाल्यानंतर ऋतुराजने धडाकेबाज फलंदाजी करत संघाची मंदावलेली धावगती वाढवली. सीएसकेने 5 षटकात 38 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सविरूद्धच्या एल क्लासिको सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने एक बदल केला आहे. तिक्षाणाच्या ऐवजी पथिराना संघात आला आहे. मुंबईची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना थोडी मदत करते. त्यामुळे हा बदल करण्यात आला असावा.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पांड्याने आपल्या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला. सेम टीम ठेवत त्यानंं धोनीचाच वारसा पुढे चालवला.
खरं तर, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणारे शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे आणि शार्दुल ठाकूर हे आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जच्या संघात आहेत. या खेळाडूंना आज सीएसकेच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
गेल्या सामन्यातही हे खेळाडू चेन्नईच्या प्लेइंग 11 चा भाग होते. चेन्नई सुपर किंग्ज सध्या दुखापतींशी झुंजत आहे. संघाचे वेगवान गोलंदाज मथिसा पाथिराना आणि दीपक चहर जखमी झाले आहेत.
मुंबई इंडियन्स आणि चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. दोघांच्या नावावर 5-5 ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आहे. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये एकूण 36 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये 20 सामने मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत. त्याचवेळी चेन्नईने 16 विजय मिळवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.