MI vs KKR Live Score esakal
IPL

MI vs KKR : इशान किशनचे अर्धशतक; मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्स राखून विजय

Kiran Mahanavar

MI vs KKR Live Score : मुंबई इंडियन्स ताळ्यात आली असून सलग दोन पराभवानंतर मुंबईने सलग दोन विजय मिळवले. कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी ठेवलेले 186 धावांचे आव्हान 6 फलंदाज आणि 17.4 षटकात पार करत सहज विजय मिळवला. मुंबईचा सलामीवीर इशान किशनला अखेर सूर गवसला. त्याने 25 चेंडूत 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधारपद सांभाळलेल्या सूर्याने देखील 43 धावांची खेळी करत आपला धावांचा दुष्काळ संपवला.

तत्पूर्वी, दुखापतीतून सावरलेल्या व्यंकटेश अय्यरने यंदाच्या आयपीएलमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. त्याने मुंबई विरूद्धच्या सामन्यात 104 धावांची शतकी खेळी करत केकेआरला 20 षटकात 185 धावांपर्यंत मजल मारून देण्यात मोठा वाटा उचलला. त्याला रसेलने 21 धावा करत चांगली साथ दिली. मुंबईकडून ऋतिक शौकीनने चांगला मारा करत 2 विकेट्स घेतल्या. तर पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने 2 षटकात 17 धावा दिल्या.

MI 130/2 (12) : इशान किशनला अखेर सूर गवसला

मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशनला अखेर सूर गवसला. त्याने रोहित शर्मा सोबत 5 षटकात 65 धावांची सलामी दिली. रोहित शर्मा 13 चेंडूत 20 धावा करून बाद झाल्यानंतर त्याने सूर्यकुमार सोबत भागीदारी रचत संघाला 8 व्या षटकात 87 धावांपर्यंत पोहचवले. अखेर वरूण चक्रवर्तीने त्याला 58 धावांवर बाद केले.

इशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डावाची सूत्रे आपल्या हातत घेतली. या दोघांनी मुंबईला 12 व्या षटकात 130 धावांपर्यंत पोहचवले.

185-6 (20 Ov) : आंद्रे रसेलचा जलवा

व्यंकटेश अय्यर शतकी खेळीनंतर बाद झाला. त्यानंतर आंद्रे रसेलने शेवटच्या षटकात 10 धावा ठोकल्या अन् केकेआरला 20 षटकात 6 बाद 185 धावांपर्यंत पोहचवले. रसेलने 11 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.

159-5  : अखेर मेरेडिथने मुंबईला दिला दिलासा

केकेआरचा धडाकेबाज फलंदाज व्यंकटेश अय्यरने 51 चेंडूत 104 धावांची दमदार खेळी करत केकेआरला एकहाती 150 च्या पार पोहचवले. मात्र अखेर रिले मेरेडिथने त्याला झेलबाद करत मुंबईला दिलासा दिला.

व्यंकटेश अय्यर शतक ठोकत एकटा भिडला

केकेआरचे एका बाजूने एक एक फलंदाज बाद होत असताना व्यंकटेश अय्यरने मात्र आपला आक्रमक पवित्रा कामय राखला. त्याने 49 चेंडूत शतकी खेळी करत केकेआरला 150 पार पोहचवले.

73-3 (8.1 Ov) : अय्यरचा धडाका तरी केकेआरला मुंबईने दिले तीन धक्के

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम केकेआरला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. केकेआरचा धडाकेबाज फलंदाज व्यंकटेश अय्यरने 22 चेंडूत नाबाद 49 धावा करत केकेआरला 8 षटकात सत्तरी पार करून दिली. मात्र मुंबईच्या पियुष चावला, ऋतिक शौकीन आणि कॅमरून ग्रीन यांना प्रत्येकी एक विकेट घेत केकेआरला तीन धक्के दिले.

MI vs KKR Live Score: कोलकाताला पहिला धक्का, जगदीसन शून्यावर पॅव्हेलियनमध्ये

  बालेकिल्ला मुंबई इंडियन्सने जिंकले नाणेफेक! घेतला मोठा निर्णय

या सामन्यात रोहित शर्मा खेळत नसून त्याच्या जागी सूर्यकुमार यादव कर्णधारपद भूषवत आहे. सूर्यकुमारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघात बदल करण्यात आला आहे. या सामन्यात ड्युएन जॉन्सनला संधी मिळाली. कोलकाताने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

बाजी कोण मारणार?

आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी त्यांच्या घरच्या मैदानावर होणार आहे. घरच्या मैदानावर प्रत्येक संघ मजबूत असतो. अशा स्थितीत या सामन्यात मुंबईचा वरचष्मा असला तरी कोलकात्याला ते हलक्यात घेऊ शकत नाही कारण या संघाने गेल्या काही सामन्यांमध्ये सांगितले आहे की कुठूनही सामना जिंकण्याची ताकद त्यांच्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय पक्ष मेले तरी... निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, शरद पवारांवरही घणाघात

Latest Maharashtra News Updates : पुण्याच्या कॅन्टोन्मेंट मतदार संघात रेवंत रेड्डीचं तेलगू भाषेत भाषण; मोदींवर केली टीका

Maratha Reservation: सरकार नालायक, तरुण जीव संपवतायेत; मनोज जरांगेंचा संताप....!

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

IPL 2025: मुंबईचा कोच आता RCB मध्ये सामील; 18 व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT