impact player IPL 2024 News Marathi sakal
IPL

‘इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधारांच्या अडचणी वाढतील कारण.... दिग्गज खेळाडूचे मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

मुंबई, ता. ४ ः आयपीएलमध्ये असलेला इम्पॅक्ट खेळाडूचा नियम येत्या विश्वकरंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेत नसल्यामुळे या स्पर्धेत प्रत्येक कर्णधाराला अधिक वैचारिक आणि युक्तीने डावपेच तयार करावे लागतील असे मत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने व्यक्त केले.

वानखेडे स्टेडियमवरील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या यामन्यात चार विकेट मिळवणाऱ्या स्टार्क या सामन्यानंतर संवाद साधताना बोलत होता. आयपीएलमध्ये गतवर्षापासून इम्पॅक्ट खेळाडूचा नियम लागू करण्यात आला आहे त्यामुळे फलंदाज बिनधास्त टोलेबाजी करतात आणि सातत्याने दोनशेच्या पलिकडे धावा होत आहेत. यंदाच्या स्पर्धेत तर २५० पार धावा सहजपणे झालेल्या आहेत.

इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे संघ रचनाच बदलली आहे. प्रत्येक संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी खोलवर झाली आहे, असे सांगून स्टार्क म्हणाला, अधिक धावा होण्यासाठी हा नियम कारणीभूत ठरत आहे. खेळपट्या, मैदानांमुळेही अधिक धावा होत आहेत. या नियामुळे फलंदाजी किंवा गोलंदाजी अष्टपैलू आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर फलंदाजीस येतो. एवढी लांबवर फलंदाजी झालेली आहे.

इम्पॅक्ट खेळाडूचा पर्याय असल्यामुळे सुरुवातीचा फलंदाज बेधडक टोलेबाजी करतात. त्यांच्या मनात कोणतीही भीती नसते. हा नियम गोलंदाजांसाठी मारक आहे, असेही स्टार्क म्हणाला.

शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकताची ५ बाद ५७ अशी अवस्था झाली होती. व्यंकटेश अय्यर एका बाजूने फलंदाजी करत होता. त्याला साथ देण्यासाठी मनिष पांडेला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून पाठवण्यात आले त्याने व्यंकटेशसह ८३ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. इम्पॅक्ट खेळाडूचा नियम नसता कर कोलकताला १६९ धावांपर्यंत कदाचीत मजल मारता आली नसती.

या आयपीएलमध्ये इम्पॅक्ट खेळाडूमुळे चांगल्या धावा होत आहेत. भागीदारीही मोठ्या होत आहेत. काही वैयक्तिक मोठ्या खेळीही होत आहेत ही एक बाजू आहे, पण येत्या विश्वकरंडक स्पर्धेचा विचार करता आयपीएलमधील धावांचा हाच ओघ कायम रहाणार नाही त्यामुळे कर्णधारांना त्याप्रमाणे डावपेच तयार करावे लागतील, असे स्टार्कने सांगितले.

कोलकता संघाने स्टार्कसाठील २४.७५ कोटी मोजले. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक रक्कम आहे. स्टार्कला मात्र अपेक्षापूर्ण करता आल्या नव्हत्या. अखेर मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याला फॉर्म सापडला. सर्वाधिक किंमतीचे आपल्यावर दडपण नव्हते, असे स्टार्क म्हणाला. ही रक्कम मी ठरवली नाही त्यामुळे मी कशाला त्याचे दडपण घेऊ, असेही त्याने सांगितले.

जून महिन्यात होत असलेल्या विश्वकरंडक ट्वेन्टी-२० सामन्यासाठी ही उत्तम तयारी असली तरी केवळ ही स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन मी आयपीएलमध्ये खेळत नाही, कोलकता संघाला विजय मिळवून देणे हेच आपले ध्येय असल्याचे त्याने सांगितले.

प्रत्येक कर्णधाराला हुशारीने अंतिम ११ खेळाडू निवडताना बराच विचार करावा लागेल. आयपीएलमधील हा अनुभव विश्वकरंडक स्पर्धेत उपयोगी ठरणार नाही.

- मिचेल स्टार्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT