Mohsin Khan IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 63 व्या सामन्यात मार्कस स्टॉइनिसच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 5 धावांनी पराभव केला. मुंबईला शेवटच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज होती. त्याचवेळी लखनऊकडून मोहसीन खान गोलंदाजी करत होता.
मुंबईसाठी टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीन स्ट्राइकवर होते पण मोहसीनने केवळ 5 धावा खर्च करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या मॅच-विनिंग बॉलिंगनंतर मोहसीन म्हणाला की, माझ्या वडिलांना काल ICU मधून डिस्चार्ज मिळाला आणि ते गेल्या 10 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये होते आणि मी त्यांच्यासाठी हे केले, ते नक्कीच पाहत असतील.
शेवटच्या षटकात चमकदार गोलंदाजी केल्यानंतर मोहसीन खान म्हणाला, "मी सरावात जे केले ते अंमलात आणण्याची योजना होती आणि ती मी अंमलात आणली. अगदी कृणाल माझ्याशी बोलत होता आणि मी त्याला तेच सांगितले. रनअप सारखाच आहे, शेवटच्या षटकात बदलला नाही. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, स्कोअर बोर्डकडे पाहिले नाही आणि चांगले 6 चेंडू टाकले. विकेट पकडलेली असल्याने मी स्लोअर बॉलचा प्रयत्न केला, पण मी त्यापैकी दोन टाकले आणि नंतर यॉर्करला गेलो आणि तो उलटही होत होता.
डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान पुढे म्हणाला, "हा कठीण काळ होता कारण मी दुखापतग्रस्त होतो, एका वर्षानंतर खेळत होतो. माझ्या वडिलांना काल ICU मधून डिस्चार्ज मिळाला आणि ते गेल्या 10 दिवसांपासून रुग्णालयात होते आणि मी त्यांच्यासाठी हे केले, ते पाहत असतील. मी संघ आणि संघाचे आभार मानू इच्छितो. गेल्या सामन्यात माझी कामगिरी चांगली झाली नसली तरी मला हा खेळ खेळवल्याबद्दल मी सपोर्ट स्टाफ, गौतम सर, विजय दहिया सरांचे आभारी आहे. यासामन्यात मोहसिन खानने 3 ओव्हरमध्ये 26 रन्स देऊन मॅचमध्ये एक विकेट घेतली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.