MS Dhoni Completed 5000 Runs For CSK IPL 2024 esakal
IPL

MS Dhoni MI vs CSK : 6,6,6,2... तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं! धोनीची विक्रम करण्याची स्टाईलच भारी

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Completed 5000 Runs For CSK IPL 2024 : महेंद्रसिंह धोनी नाम ही काफी है! धोनी आज सीएसकेकडू आपला 250 वा आयपीएल सामना खेळत होता. विराटनंतर एका फ्रेंजायजीकडून एवढे सामने खेळणारा तो दुसराच खेळाडू ठरला. याचबरोबर तो सीएसकेकडून 5000 धावा करण्याच्या उंबरठ्यावर देखील होता. त्याला फक्त 4 धावांची गरज होती.

मात्र आजच्या सामन्यात सीएसकेच्या ऋतुराज आणि शिवम दुबेनं ज्या प्रकारे फलंदाजी केली ते पाहता धोनी बॅट घेऊन मैदनावर येईल असं वाटत नव्हतं. त्यात शेवटच्या षटकात डॅरेल मिचेल बाद झाला अन् वानखेडेवर एकच दंगा सुरू झाला. धोनी धोनीच्या गजरात चेन्नईचा थला मैदानावर उतरला.

थलाकडं फक्त चार चेंडू होते. त्यात त्याला चार धावा करून आपला विक्रम करायचा होता. मात्र थलाच्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता. त्यानं आल्या आल्या षटकार ठोकत विक्रमांचा किस्सा आधी संपवला. त्यानंतर हार्दिकला डावा उबा धूत त्यानं 4 चेंडूत 20 धावा ठोकल्या. यामुळं चेन्नईनं 206 धावांपर्यंत मजल मारली.

धोनीची विक्रम करण्याची ही स्टाईल पाहून समोर 66 धावा करून उभा असलेल्या शिवमनं देखील तोंडात बोटं घातली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने सीएसकेला पॉवर प्लेमध्ये वेसन घालण्याचा प्रयत्न केला. सीएसकेनेही सलामी जोडीत बदल करत अजिंक्य रहाणेला सलामीला पाठवलं होतं. मात्र ही ट्रिक चालली नाही. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ऋतुराजने आधी रचिन रविंद्र आणि त्यानंतर शिवम दुबेसोबत दमदार भागीदारी रचली.

शिवम दुबेसोबत तर ऋतुराजने 90 धावांची तडाखेबाज भागीदारी रचली. रोहितने दिलेल्या जीवनदानाचा फायदा घेत ऋतुराजने 40 चेंडूत 69 धावांची खेळी करत संघाला 150 धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर शिवम दुबेने 66 धावांची अर्धशतकी खेळी करत सीएसकेला 180 धावांच्या पार पोहचवले.

मात्र 4 चेंडूत 20 धावा ठोकत सीएसकेला 200 धावांचा मार्क गाठून देण्यात धोनीनं मोलाचं योगदान दिलं. शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याला 26 धावांचा चोप देण्यात सीएसके यशस्वी ठरली यात धोनीनं 20 धावांच योगदान दिलं.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT