MS Dhoni daughter ziva hugged father greeted BJP leader Ashish Shelar video goes viral IPL 2023 GT vs CSK  
IPL

Video : मॅच जिंकल्याच्या आनंदात लेकीची धोनीला मिठी! शेलारांशी देखील केला शेकहँड

रोहित कणसे

GT vs CSK : इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात सीएसकेने १५ धावांनी विजय मिळला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्जने १०व्यांदा आयपीएलची फायनल गाठली आहे. दरम्यान या मॅचनंतर एमएस धोनी आणि त्याची मुलगी झिवा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. (MS Dhoni daughter ziva hugged father greeted BJP leader Ashish Shelar video goes viral)

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यानंतर मैदानावरच भाजपचे नेते आशिष शेलार हे सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिह धोनीशी बोलत होते. यादरम्यानच धोनीची मुलगी झिवाने धावत येऊन धोनीला मिठी मारली. तिने शेलार यांच्याशी देखील शेकहँड केलं.

आशिष शेलारांनी त्यांच्या सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट केली आहे. शेलारांनी महान क्रिकेटपटू, चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन एमएस धोनी आणि त्याची लाडकी मुलगी झिवा यांना भेटणे आणि संवाद साधणे खूप आनंददायक होते, असे म्हटले आहे. दरम्यान या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अन् झिवाने धोनीला मिठी मारली

एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी आणि मुलगी झिवा देखील गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी धोनीच्या संघाने सामना जिंकताच दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसून आल. दरम्यान सामना संपल्यानंतर मुलगी झिवा मैदानावर धावली आणि वडील एमएस धोनीला मिठी मारली. त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून दोघांमधील हे प्रेम पाहून चाहते भारावून गेले आहेत.

सामन्यात काय झालं?

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना CSK ने २० षटकात 7 गडी गमावून १७२ धावांचे लक्ष ठेवले. 'प्लेअर ऑफ द मॅच' रुतुराज गायकवाडने सर्वाधिक ६० धावा केल्या. १७३ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघ २० षटकात सर्व १० गडी गमावून केवळ १५७ धावाच करू शकला. संघाकडून शुभमन गिलने सर्वाधिक ४२ धावा केल्या. सीएसकेकडून रवींद्र जडेजा, महेश थिकशन आणि दीपक चहर यांनी २-२ विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT