MS Dhoni Fan : आयपीएल 2024 मधील 59 वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. हा सामना 35 धावांनी जिंकून गुजरातने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी पुन्हा एकदा एमएस धोनीची तुफानी फलंदाजी चाहत्यांना पाहायला मिळाली.
दरवेळेप्रमाणे यावेळीही धोनी क्रीझवर आला आणि गगनचुंबी षटकार ठोकले. या सामन्यात धोनी पुन्हा एकदा आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी धोनीचा एक क्रेझी फॅन अचानक मैदानात घुसला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या सामन्यात एमएस धोनीने 26 धावांची नाबाद तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने 3 शानदार षटकारही मारले. ज्यामध्ये राशिद खानच्या ओव्हरमध्ये माहीने लागोपाठ 2 षटकार ठोकले. धोनी सामन्याच्या शेवटच्या षटकात फलंदाजी करत असताना एक चाहता थेट मैदानात आला. आणि त्याने माहीचे पाय पकडले. आणि पुढे धोनीने चाहत्याला मिठी मारली. पण यानंतर सिक्युरिटी आली आणि या क्रेझी फॅनला पकडून बाहेर काढले. ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 231 धावा केल्या. या सामन्यात गुजरातकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी शतके झळकावली. फलंदाजी करताना गिलने 51 चेंडूत 103 धावा केल्या. आपल्या खेळीदरम्यान शुभमनने 5 चौकार आणि 7 शानदार षटकार मारले. याशिवाय साई सुदर्शनने 55 चेंडूत 104 धावांची खेळी केली. साईने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 6 षटकार मारले.
232 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 198 धावाच करू शकला. या सामन्यात सीएसकेची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. कर्णधार गायकवाडला खातेही उघडता आले नाही. सीएसकेकडून फलंदाजी करताना डॅरिल मिशेलने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. याशिवाय मोई अलीने 56 धावा केल्या. या मोसमातील 12 सामन्यांमधला चेन्नईचा हा सहावा पराभव आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.