MS Dhoni CSK IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर 27 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह सीएसके संघाने आयपीएल प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.
चेन्नईच्या आठ गडी बाद 167 धावांच्या प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ आठ विकेट्सवर 140 धावाच करू शकला. दिल्लीविरुद्ध सीएसकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सामना जिंकल्यानंतर CSK कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मोठे वक्तव्य केले आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी म्हणाला की, दुसऱ्या हाफमध्ये चेंडू खूप वळत होता. आमच्या फिरकीपटूंनी सीमचा पुरेपूर फायदा घेतला. गोलंदाजांनी फक्त विकेट शोधू नये तर सर्वोत्तम गोलंदाजी करावी अशी माझी इच्छा होती.
धोनी पुढे म्हणाला, बॅटिंग लाइनअप म्हणून आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. चांगली गोष्ट म्हणजे मोईन आणि जडेजाला फलंदाजीची संधी मिळाली.
शेवटच्या टप्प्यापूर्वी सर्वांचा फलंदाजीचा सराव झाला आहे. 9 चेंडूत 20 धावा करणाऱ्या धोनीने सांगितले की, माझे काम काही चौकार आणि षटकार मारणे आहे. मी जे काही चेंडू खेळत आहे त्यात योगदान दिल्यास आनंद होतो.
कर्णधार एमएस धोनी पुढे म्हणाला की, सँटनर असा गोलंदाज आहे ज्याने नवीन चेंडूवर सपाट विकेट्सवर चांगली कामगिरी केली आहे. तो सीम मारतो आणि चांगल्या गतीने गोलंदाजी करतो.
ऋतुराज गायकवाड खरोखरच चांगली फलंदाजी करत असून त्याला खेळ चांगला समजतो. स्ट्राईक रोटेट करण्यात तो पारंगत खेळाडू आहे. तुमच्या संघात अशा खेळाडूंची गरज आहे.
CSK ने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 जिंकले आहेत आणि 3 सामने गमावले आहेत. संघाचे 15 गुण आहेत आणि ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचा रन रेट 0.493 आहे. CSK चे अजून दोन सामने बाकी आहेत, जे त्याला दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळायचे आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.