MS Dhoni On Matheesha Pathirana  esakal
IPL

MS Dhoni On Matheesha Pathirana : धोनी ज्युनियर मलिंगा पथिरानाबद्दल म्हणाला, श्रीलंकेसाठी ठरणार स्टार मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni On Matheesha Pathirana : चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्स राखून पराभव करत आयपीएलच्या गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसके मुंबईला 20 षटकात 8 बाद 139 धावात रोखले. यानंतर हे टाग्रेट 17.4 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत चेन्नईने सामना जिंकला.

या सामन्याचा मानकरी 4 षटकात 15 धावा देत 3 बळी टिपणारा मथीशा पथिराना ठराला. 20 वर्षाच्या मथीशाने 64 धावा करणाऱ्या नेहाल वधेरा, 20 धावा करणाऱ्या ट्रिस्टन स्टब्स आणि अर्शद खानची शिकार केली. सामना झाल्यावर महेंद्रसिंह धोनीने मथीशा पथिरानाबद्दल गौरवउद्गार काढले मात्र त्याला एक मोलाचा सल्ला देखील दिला.

धोनी म्हणाला की, 'ज्या गोलंदाजाची अॅक्शन ही अतरंगी आहे त्या गोलंदाजाला पिक करणे फलंदाजाला अवघड जातेच. वेग आणि व्हेरिएशन नाही मात्र सातत्य महत्वाचे असते. मला असे वाटते की पथिरानाने लाल चेंडूवरील क्रिकेट म्हणजेच कसोटी क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देऊ नये. त्याने आयसीसीच्या सर्व स्पर्धा खेळाव्यात. तो श्रीलंकेसाठी एक चांगली संपत्ती ठरू शकतो. गेला हंगाम त्याच्यासाठी चांगला गेला नव्हता. मात्र या हंगामात तो आपली ताकद दाखवत आहे.'

दरम्यान, सामनावीराचा पुरस्कार मिळालेल्या मथीशा पथिराना म्हणाला की, 'माझा सीएसकेसोबतचा प्रवास गेल्या वर्षी सुरू झाला. मी बदली खेळाडू म्हणून आलो आणि दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र या हंगामात मी जास्त सामने खेळतोय याबद्दल मी खूष आहे. संघ व्यवस्थापनाने मला खूप आत्मविश्वास दिला आहे.'

'ही टी 20 क्रिकेटमधील माझी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. मी माझ्या कामगिरीवर खूष आहे.' पथीरानाला विकेट घेतल्यावर करत असलेल्या सेलिब्रेशनबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला की मी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा डाय हार्ट फॅन आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT