Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून केव्हाच बाहेर गेलेला आहे. आता ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा तोंडावर आहे; परंतु उर्वरित दोन सामन्यांसाठी जसप्रीत बुमराला विश्रांती देण्याचा कोणताही विचार नाही, असे मत मुंबई संघाचा फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्डने सांगितले.
वानखेडे स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबई संघाने हैदराबाद संघाचा सहज पराभव केला आणि सलग चार पराभवानंतर विजय मिळवला. त्यामुळे तळाच्या दहाव्या स्थानावरून नवव्या क्रमांकावर प्रगती केली. १२ सामने झालेल्या मुंबई संघाचे आता अखेरचे दोनच साखळी सामने शिल्लक आहेत.
सोमवारी सामना झालेल्या पत्रकार परिषदेस आलेला पोलार्डला बुमराला विश्रांती देणार का, हा प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना तो म्हणतो, आम्ही असा कोणताही विचार केलेला नाही. मी फलंदाजीचा प्रशिक्षक असल्यामुळे गोलंदाजीबाबतचा निर्णय मी घेऊ शकत नाही, आम्ही येथे सर्व जण पूर्ण आयपीएल खेळायला आलो आहोत; पण कधी कधी अधिक पुढचा विचार करतो.
प्लेऑफची संधी नसली तरी ही आयपीएल विजयाने पूर्ण करणे हे महत्त्वाचे आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे जात आहोत. जेव्हा आयपीएल पूर्ण होईल आणि बुमरा भारतीय संघात दाखल होईल तेव्हा त्याचा विश्वकरंडक स्पर्धेसाठीचा विचार सुरू होईल, अशी सारवासारव पोलार्डने केली.
नऊ दिवसांची अतिरिक्त विश्रांती
मुंबई इंडियन्सचा अखेरचा सामना १७ मे रोजी लखनौ संघाविरुद्ध होणार आहे आणि वेस्ट इंडीज-अमेरिकेत होत असलेली ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा १ जूनपासून सुरू होत आहे. आयपीएल २६ मे रोजी संपत आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफ गाठणार नसल्यामुळे बुमरा, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना नऊ दिवसांची अतिरिक्त विश्रांती मिळणार आहे.
आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेले असले तरी उर्वरित दोन सामन्यांसाठी बुमराला खेळवण्यात येणार आहे. आयपीएल अगोदर इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका झाली. बहुतेक सामने तीन दिवसांच्या आत संपले. एक-दोन दिवसांची अधिक विश्रांती मिळाली होती, तरीही सामन्यांचा ताण पडू नये, म्हणून एका कसोटीतून बुमराला विश्रांती दिली होती. या मुद्यावरून सोशल मीडियावर मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत.
‘३६० डिग्री’ टोलेबाजी करण्याची क्षमता असलेल्या सूर्यकुमारसारख्या फलंदाजाला कोचिंग करणे फार अवघड असते. त्याच्याकडे मैदानाच्या सभोवार फटके मारण्याची कला नैसर्गिक आहे. तो फारच आक्रमक आहे. परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर तो कोणत्याच गोलंदाजाची गय करत नाही, असे पोलार्डने सांगितले.
कधी कधी कोणतेही चेंडू कशाप्रकारेही मारण्याची परिस्थिती नसते अशा वेळी सावध खेळावे लागते आणि जम बसल्यानंतर हल्लाबोल करायचा असतो, ही कला सूर्यकुमारला अवगत झाली आहे, असेही पोलार्ड म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.