IPL 2024 MI vs PBKS DRS Cheating News Marathi sakal
IPL

MI vs PBKS : DRS साठी ड्रेसिंग रुममधून खाणाखुणा? मुंबई इंडियन्स संघावर गंभीर आरोप; सामन्याचा Viral Video

IPL 2024 MI vs PBKS DRS Cheating : मुंबई संघाची फलंदाजी सुरू असताना १५ व्या षटकात ही घटना घडली.

Kiran Mahanavar

IPL 2024 Mumbai Indians DRS Cheating vs PBKS : मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेकीत फसवेगिरी करतो, असा त्यांच्यावर होत असलेला आरोप ताजा असतानाच गुरुवारी पंजाबविरुद्धच्या सामन्यात डीआरएस घेण्यावरून ड्रेसिंग रुममधून खाणाखुणा करण्यात आल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई संघाची फलंदाजी सुरू असताना १५ व्या षटकात ही घटना घडली. पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सूर्यकुमार यादवला टाकलेला चेंडू वाईड रेषेच्या जवळून गेला. पंचांनी तो चेंडू वाईड ठरवला नाही.

सूर्यकुमारही डीआरएस घेण्यावरून साशंक होता; परंतु ड्रेसिंग रुममध्ये असलेल्या टीव्हीवर रिप्ले पाहून खेळाडू टीम डेव्हिडने डीआरएस घेण्याची खुण केली. इतकेच नव्हे तर प्रशिक्षक मार्क बाऊचरही हेच सुचवत होते.

मैदानावर असलेला पंजाब संघाचा कर्णधार सॅम करनच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्याने लगेचच पंचांचे लक्ष वेधले; परंतु पंचांनी त्याच्याकडे लक्ष न देता वाईडसाठी तिसऱ्या पंचांकरिता खुण केली. रिव्ह्यू घेतल्यानंतर हा चेंडू वाईड ठरला.

या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ आणि छायाचित्र प्रतिमा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या आहेत. गेल्या रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या बंगळूरविरुद्धच्या सामन्यात मुंबई कर्णधार हार्दिक पंड्याने नाणे पाठीमागे उडवले होते आणि सामनाधिकारी जवगल श्रीनाथ यांनी ते उलट्या बाजूने उचलून हार्दिकने नाणेफेक जिंकली, असे सांगितले.

त्यावेळी बंगळूरचा कर्णधार फाफ डुप्लेसीच्या लक्षात हा प्रकार आला होता. त्यामुळे त्याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्स नाणेफेकीस आला असताना वानखेडेवरील तो प्रकार कसा घडला याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर मोठी घटना! सुमारे 40-50 फूट खोलवर लागली आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT