Hardik Pandya emotional post after home defeat against RR News Marathi sakal
IPL

Hardik Pandya : मुंबईच्या पराभवाच्या हॅटट्रिकनंतर हार्दिक पांड्या झाला भावूक... काही मिनिटांतच पोस्ट व्हायरल

Hardik Pandya IPL 2024 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 मधील सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Kiran Mahanavar

Hardik Pandya IPL 2024 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 मधील सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केल्याने मुंबईला अजूनही विजयाचे खातेही उघडता आले नाही.

या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू होण्यापूर्वी हार्दिक नाणेफेकीसाठी बाहेर आला तेव्हा प्रेक्षकांनी पांड्याला ट्रोल केले. आता राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दारूण पराभवानंतर कर्णधार हार्दिकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

खरं तर, मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर मुंबई संघाचा कर्णधार हार्दिकने आपल्या माजी खेळाडूवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने लिहिले की, जर तुम्हाला या संघाबद्दल एक गोष्ट जाणून घ्यायची असेल तर ती म्हणजे आम्ही कधीही हार मानणार नाही. आम्ही लढत राहू आणि लढत राहू.

नवीन कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची आयपीएल 2024 मध्ये अत्यंत खराब सुरुवात झाली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने या हंगामात पहिले तीन सामने गमावले. आपल्या नेतृत्वाखाली पांड्याने 2022 मध्ये गुजरात टायटन्ससाठी आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते आणि 2023 मध्ये गुजरात संघाला अंतिम फेरीत पोहोचवले होते. मात्र, मुंबईत परतताना त्याची सुरुवात खराब झाली. अहमदाबाद आणि हैदराबादनंतर मुंबईतही हार्दिकला चाहत्यांकडून नाराजीचा सामना करावा लागला.

आयपीएल 2024 च्या चौदाव्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 9 गडी गमावून 125 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसमोर मुंबईची आघाडीची फळी फ्लॉप ठरली. ट्रेंट बोल्टने मुंबईच्या तीन फलंदाजांना शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिक आणि तिलक वर्मा यांच्यात अर्धशतकी भागीदारी रचली. पण तिलक 32 तर हार्दिक 34 धावा करून आऊट झाले. बोल्टशिवाय चहलनेही राजस्थानकडून ३ बळी घेतले.

प्रत्युत्तरात 126 धावांचा पाठलाग करताना राजस्थान संघाने अवघ्या 15.3 षटकांतच लक्ष्य गाठले. राजस्थान संघाकडून रियाग परागने 54 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT