Hardik Pandya Statement After loss against SRH ipl 2024 marathi news sakal
IPL

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार पांड्याची प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

Hardik Pandya Statement After loss against SRH : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या सतराव्या हंगामात खेळलेल्या मुंबई इंडियन्सला आतापर्यंत सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Kiran Mahanavar

Hardik Pandya Statement After loss against SRH : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या सतराव्या हंगामात खेळलेल्या मुंबई इंडियन्सला आतापर्यंत सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात संघाचा दारुण पराभव झाला, तर आता सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 277 धावा केल्या. आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्या.

प्रत्युत्तरात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ 246 धावाच करू शकला. सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजीत आणखी सुधारणा करण्याबाबत बोला आहे.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, विकेट चांगली होती, पण एवढी मोठी धावसंख्या होईल, असे आम्हाला वाटले नव्हते. मी असे म्हणत नाही की सनरायझर्स हैदराबाद संघाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली नाही. पण या सामन्यात 500 हून अधिक धावा झाल्या यावरून स्पष्ट होते की, ही खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली होती.

पुढे तो म्हणाला की, या सामन्यात गोलंदाजी करताना आम्ही काही वेगळ्या गोष्टी आजमावू शकलो असतो, पण आम्ही तसे करू शकलो नाही. आमच्याकडे युवा गोलंदाजी आहे.

शेवटी तो म्हणाला की, लक्ष्याचा पाठलाग करताना आम्ही चांगली फलंदाजी केली. या सामन्यात आमच्याकडून काही गोष्टी निश्चितच चुकल्या, आगामी सामन्यांपूर्वी त्या सुधारल्या तर आमची कामगिरीही चांगली होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT