Arjun Tendulkar IPL 2023 : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात मुंबईने गोलंदाजीत खूप खराब कामगिरी केली. त्यांनी शेवटच्या षटकात जवळपास 96 धावा देत पंजाबला 214 धावांपर्यंत मजल मारू दिली. यानंतर मुंबईने फलंदाजीत झुंजारपणा दाखवत 201 धावांपर्यंत मजल मारली खरी मात्र त्यांना सामना जिंकता आला नाही. गेल्या दोन सामन्यात आणि पंजाबविरूद्धच्या सामन्यात पहिल्या स्पेलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने 15 व्या षटकात 31 धावा दिल्या. अर्जुन तेंडुलकर मुंबईचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने तीन षटकात 48 धावा देत एक विकेट घेतली. त्याची इकॉनॉमी ही 16 इतकी होती.
या कामगिरीनंतर मुंबईचा प्रशिक्षक मार्क बाऊचरने रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरला 15 वे षटक का दिले यामागची रणनिती सांगितली. बाऊचर म्हणाला, 'आम्ही सामन्यावर 15 व्या षटकापर्यंत नियंत्रण राखले होते. मात्र त्यानंतर आम्ही शेवटच्या 5 षटकात 96 धावा दिल्या. इथं आम्ही चुकलो. हे खूप निराशाजनक आहे कारण तोपर्यंत आम्ही वर्चस्व मिळवले होते. मात्र आम्ही पराभूत झालो. आपण सामना कुठे हरलो यावर बोट ठेऊ शकतो.'
बाऊचर पुढे म्हणाला की, 'मला वाटते की रोहित शर्मा हा खूप अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्याला वाटले असेल की अर्जुनला 15 व्या षटकात गोलंदाजी देऊन त्याचे षटक काढून घेता येईल. मात्र कधी निर्णय तुमच्या बाजूने जातात तर कधी तुमच्या विरूद्ध जातात. दुर्दैवाने हा निर्णय आमच्या बाजूने गेला नाही. कधी कधी अशी षटक काढूण घेण्याची रणनिती उलटी पडू शकते. हेच तर टी 20 क्रिकेटचे स्वरूप आहे.'
अर्जुन तेंडुलकरबद्दल बाऊचर म्हणाला की, 'अर्जुन तेंजुलकरसाठी फलंदाजीला पोषक वातावरणात गोलंदाजी करणे आव्हानात्मक होते. त्याने एक किंवा दोन चेंडूच चुकीचे टाकले असतील. तो बहुदा दबावात आला आसेल. मात्र त्याला यातूनच शिकावे लागणार आहे. इथं जग काही संपत नाही. आता कुठे आयपीएल मध्यावर आली आहे. मला वाटते की तो जारदार पुनरागमन करेल. या गोष्टीवर लवकरात लवकर मात करण्यासाठी त्याला सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंचा पाठिंबा असले.'
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.