Mumbai Indians First Team Out of IPL 2024 news sakal
IPL

IPL 2024 : हैद्राबादच्या वादळाने मुंबईच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात... प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारी ठरली पहिली टीम

Mumbai Indians First Team Out of IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा 10 गडी राखून पराभव केला.

Kiran Mahanavar

Mumbai Indians First Team Out of IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह हैदराबादचे 14 गुण झाले असून ते पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सनंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.

हैदराबादने 166 धावांचे लक्ष्य 9.2 षटकांत कोणतेही नुकसान न करता पूर्ण केले. हैदराबादचे 14 गुण आहेत तर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी 16 गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

14 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. ज्यामध्ये कोणत्याही एका संघाचे सामना जिंकला तर त्यांचे किमान 14 गुण होतील. आणि मुंबई इंडियन्स आता त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकून जास्तीत जास्त 12 गुण मिळवू शकेल. जे त्याला पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुरेसे नाही.

या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली होती. सलग 3 सामन्यांत त्यांचा पराभव झाला. यानंतर, त्याने चारपैकी तीन सामने जिंकले परंतु नंतर चार सामने गमावले ज्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्याच्या आशा धुळीस मिळाल्या.

मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक विकेट घेतल्या. बुमराहने 12 सामन्यात 18 विकेट घेतल्या. पण त्यांच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब होती. मुंबईच्या एकाही फलंदाजाला 12 डावात 400 धावांचा टप्पा गाठता आला नाही. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 384 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने 9 डावात 334 धावा केल्या. रोहित शर्मा 12 डावात 330 धावा करू शकला आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर सनरायझर्सने सर्वात जलद 160 हून अधिक धावांचे लक्ष्य पार केले आणि लखनौचा 10 गडी राखून पराभव केला. हेडने 30 चेंडूंत आठ चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद 89 धावा केल्या. तर शर्माने 28 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या त्याने आठ चौकार आणि सहा षटकार मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT