MI vs KKR IPL 2024 Points Table sakal
IPL

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

MI vs KKR IPL 2024 Points Table : कधी नव्हे ती गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली, पण फलंदाजांनी त्याचे मातेरे केले. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या आयपीएलमधील अधोगती कायम राहिली.

शैलेश नागवेकर ः सकाळ वृत्तसेवा

MI vs KKR IPL 2024 Points Table : कधी नव्हे ती गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली, पण फलंदाजांनी त्याचे मातेरे केले. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या आयपीएलमधील अधोगती कायम राहिली. आठव्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे प्ले-ऑफ गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या. वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात १६९ धावा करूनही कोलकता संघाने २४ धावांनी विजय मिळवला.

बुडत्याचा पाय आणखी खोलात, अशी अवस्था मुंबई संघाची झाली आहे. नुवान तुषारा आणि जसप्रीत बुमरा यांच्या प्रत्येकी ३ विकेटमुळे त्यांनी कोलकता संघाला १६९ धावांत गुंडळाले. हे आव्हान कठीण नव्हतेच, पण मुंबईच्या भक्कम फलंदाजीचा गड ढासळला. कोलकताचे फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी मुंबई फलंदाजांना कात्रीत पकडले.

रोहितचे अपयश कायम

रोहित शर्मा गेल्या काही सामन्यांत अपयशी ठरत आहे. आज तो १२ चेंडूत ११ धावाच करू शकला. सुनील नारायणच्या दोन चेंडूंवर एकही धाव न करू शकल्यावर तो पुढच्या चेंडूवर बॅट फिरवणार हे अपेक्षित होते आणि तसेच झाले. त्या अगोदर ईशान किशनने मिचेल स्टार्कला षटकार आणि चौकार मारला खरा; परंतु लगेचच यॉर्करवर बाद झाला. त्यानंतर स्टार्कने दुसऱ्या हप्त्यात एकाच षटकांत तीन विकेट मिळवल्या.

नमन धीर, तिलक वर्मा, नेहल वधेरा हे मधल्या फळीचे तीन फलंदाज चक्रवर्ती आणि नारायणसमोर माघारी फिरले. त्यामुळे मुंबईनेही निम्मा संघ ७० धावांत गमावला होता. त्यानंतर हार्दिक पंड्या केवळ १ धाव करून बाद झाल्यावर मुंबईवर पराभवाच्या ढगांनी गर्दी केली.

सूर्यकुमारचा प्रतिकार

सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूंत ५६ धावा केल्या आणि वैभव अरोराच्या एका षटकात २० धावा फटकावून आव्हान ३६ चेंडूत ६० असे केले; परंतु ५० धावांची गरज असताना तो बाद झाला आणि तेथेच मुंबईच्या आशाही संपुष्टात आल्या.

कोलकताचीही खराब सुरुवात

मलिंगा स्टाईल तिरकस शैली असलेल्या श्रीलंकेच्याच तुषारासाठी आजचा दिवस फलदायी होता. पहिल्याच षटकात त्याने फिल साल्टची विकेट मिळवली. त्यानंतरच्या षटकात अंगक्रिश रघुवंशी आणि धोकादायक सुनील नायारण यांना बाद केले. त्यामुळे कोलकताची ३ बाद २८ अशी अवस्था झाली. आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारणारा कोलकताचा कर्णधार श्रेयस अय्यर केवळ सहाच धावा करू शकला.

तीन फलंदाज बाद होत असताना सुनील नारायण मात्र एका बाजूने उभा होता. त्याने हार्दिक पंड्याचा पहिलाच चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावला, पण दुसऱ्या चेंडूवर यष्टी गमावून बसला.

रिंकू सिंगही अपयशी

विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम १५ खेळाडूंत स्थान न मिळालेला रिंकू सिंग आज आपली क्षमता पणास लावेल अशी अपेक्षा होती. दोन चौकारांसह त्याने आठ धावाही केल्या. यातील एक चौकार पियुष चावलाच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे गेला, पण याच चावलाने रिंकूचा झेल स्वतःच्या चेंडूवर घेतला.

निम्मा संघ सहा षटकांतच गारद झाल्यामुळे कोलकता संघाने डाव सावरण्यासाठी मनिष पांडलेला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून फलंदाजीस पाठवले. त्याने आपली जबाबदारी पार पाडताना व्यंकटेश अय्यरसह ६२ चेंडूत ८३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर धोकादायक रसेल धावचीत झाला. ते मुंबई संघाच्या पथ्यावर पडले.

संक्षिप्त धावफलक ः कोलकता १९. ५ षटकांत सर्वबाद १६९ (व्यंकटेश अय्यर ७० - ५२ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार, मनिष पांडे ४२ - ३१ चेंडू, २ चौकार, २ षटकार, नुवान तुषारा ४-०-४२-३, जसप्रीत बुमरा ३.५-०-१८-३, हार्दिक पंड्या ४-०-४४-२)

मुंबई ः १८.५ षटकात सर्वबाद १४५ (ईशान किशन १३, रोहित शर्मा ११, सूर्यकुमार यादव ५६ - ३५ चेंडू, ६ चौकार, २ षटकार, हार्दिक पंड्या १, टीम डेव्हिड २४, मिचेल स्टार्क ३.५-०-३३-४, वरुण चक्रवर्ती ४-०-२२-२, सुनील नारायण ४-०-२२-२, आंद्र रसेल ४-०-३०-२).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT