Suryakumar Yadav Ipl 2024 Marathi News  sakal
IPL

Suryakumar Yadav : IPL 2024 पूर्वी मुंबईला मोठा धक्का! सूर्याला लागले 'ग्रहण', इतक्या सामन्यांतून गेला बाहेर

Suryakumar Yadav Ipl 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ राहिला नाही. स्पर्धेच्या 17 व्या हंगामाचा 22 मार्चपासून थरार सुरू होणार आहे. याआधी मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav Ipl 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ राहिला नाही. स्पर्धेच्या 17 व्या हंगामाचा 22 मार्चपासून थरार सुरू होणार आहे. याआधी मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर जाऊ शकतो. अलीकडेच संघ व्यवस्थापनाने हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवली होती.

मुंबई इंडियन्स संघाचा दिग्गज फलंदाज सूर्यकुमार पहिल्या दोन सामन्यांतून बाहेर जाऊ शकतो. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये आहे आणि पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. पुनरागमन करण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आगामी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये बाहेर जाऊ शकतो.

मुंबईचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (27 मार्च) होणार आहे. या दोन सामन्यांपूर्वी एनसीएचे वैद्यकीय पथक सूर्याला फिटनेस प्रमाणपत्र देईल की नाही, याबाबत शंका आहे.

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज जखमी झाला होता. घोट्याच्या दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकाही खेळू शकला नाही. सूर्याच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाली आहे. अलीकडेच या स्टार क्रिकेटरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये तो अर्शदीप सिंगसोबत कसरत करताना दिसला होता.

फलंदाजाची कारकीर्द

33 वर्षीय फलंदाजाने टीम इंडियासाठी 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 171 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 2141 धावा केल्या आहेत. त्याला 2024 च्या टी-20 वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळू शकते.

मात्र, आयपीएल 2024 मध्ये तो कसा कामगिरी करतो यावरही सगळे अवलंबून असेल. सूर्या मुंबई इंडियन्सच्या महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 139 सामने खेळले आहेत. यामध्ये 360 डिग्री बॅट्समनने एका शतकाच्या मदतीने 3249 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT