Mustafizur Rahman | CSK Sakal
IPL

IPL 2024: CSK साठी 'या' दिवशी शेवटचा सामना खेळणार मुस्तफिजूर; बांगलादेशने सांगितली मायदेशी परतण्याची तारीख

Mustafizur Rahman: बांगलादेशने मुस्तफिजूर रेहमानला आयपीएल 2024 मध्ये एक सामना ज्यादाचा खेळण्याची परवानगी दिली असून आता तो चेन्नई सुपर किंग्ससाठी कधीपर्यंत उपलब्ध आहे, जाणून घ्या.

Pranali Kodre

Chennai Super Kings News: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली असून ६ पैकी दोनच सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्यामुळे चेन्नई सातत्याने पहिल्या चार संघात स्थान टिकवून आहे.

दरम्यान, चेन्नईकडून यंदा गोलंदाजीत सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या मुस्तफिजूर रेहमानबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज असलेला मुस्तफिजूर यंदाच्या संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध नसेल, ही माहिती यापूर्वीच होती.

तो एप्रिलच्या अखेरीस राष्ट्रीय संघाप्रती असलेल्या वचनबद्धतेमुळे मायदेशी परतणार होता. परंतु, आता बांगलादेशने त्याच्या ना हरकत प्रमाणपत्रात एका दिवसाची वाढ केली आहे. त्यामुळे आता तो १ मे रोजी पंजाब किंग्सविरुद्धचा सामना खेळल्यानंतर मायदेशी जाईल.

याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याला ३० एप्रिलपर्यंत आयपीएल खेळण्याची परवानगी दिली होती. परंतु, १ मे रोजी चेन्नई पंजाबविरुद्ध सामना खेळणार असल्याने हा सामना खेळून त्याला मायदेशी परतण्याची परवानगी मिळाली आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत क्रिकबझला माहिती दिली आहे. बांगलादेशला झिम्बाब्वेविरुद्ध ३ ते १२ मे दरम्यान टी२० मालिका खेळायची आहे. त्यानंतर अमेरिकेविरुद्ध २१ ते २५ मे दरम्यान टी२० मालिका खेळायची आहे.

बांगलादेशच्या अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की 'मुस्तफिजूरने ३० एप्रिलपर्यंत मायदेशी येणे अपेक्षित होते, पण आम्ही आता त्याला १ मे रोजी होणाऱ्या सामन्यापर्यंत आयपीएलमध्ये थांबण्याची परवानगी दिली आहे.'

'आता तो २ मे रोजी झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी येणे अपेक्षित आहे. या मालिकेनंतरही आम्ही त्याला आयपीएलसाठी पाठवणार नाही, कारण टी२० वर्ल्डकपपूर्वी त्याने काही दिवस विश्रांती घ्यावी असं आम्हाला वाटतं.'

जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. दरम्यान, मुस्तफिजूरच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने आयपीएल २०२४ मध्ये चेन्नईसाठी आत्तापर्यंत 5 सामने खेळले असून १० विकेट्स घेतल्या आहेत. तो या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये टॉप-५ मध्ये देखील आहे.

आता तो चेन्नईसाठी आगामी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध १९ एप्रिल आणि २३ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यांसाठी उपलब्ध असेल, तसेच तो २८ एप्रिल रोजी होणाऱ्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठीही उपलब्ध असेल, यानंतर तो १ मे रोजी पंजाब किंग्सविरुद्धचा सामना खेळून मायदेशी परतेल.

त्यामुळे १ मेनंतर होणाऱ्या चेन्नईच्या चार साखळी सामन्यांसाठी तो अनुपलब्ध असेल, तसेच चेन्नई प्ले-ऑफमध्ये पोहचली, तरी मुस्तफुजूर त्यांच्यासाठी उपलब्ध राहू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT