Rohit Sharma - Nita Ambani Sakal
IPL

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

Pranali Kodre

Rohit Sharma - Nita Ambani: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 67 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघात पार पडला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 18 धावांनी विजय मिळवला. हा दोन्ही संघांचा यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना ठरला. या दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान संपले असल्याने हा त्यांचा शेवटचा सामना होता.

दरम्यान, या सामन्यानंतरचे काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या सामन्यानंतर मैदानाच्या बाहेर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि संघमालकीण नीता अंबानी यांच्यात गहन चर्चा झाल्याचे दिसून आले.

त्यांच्यातील चर्चेदरम्यानचे अनेक व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या चर्चेबाबत अनेक सोशल मिडिया युजर्सने अनेक कयासही लावले आहेत.

खरंतर रोहितची चर्चा या हंगामाच्या सुरुवातीपासूनच होत आहे. आयपीएल 2024 हंगामापूर्वी मुंबईने नेतृत्वात केलेल्या मोठ्या बदलामुळे हा संघ सातत्याने चर्चेत राहिला. मुंबई इंडियन्सने हा हंगाम सुरु होण्यापूर्वी रोहितला कर्णधारपदावरून हटवत हार्दिककडे नेतृत्वाची धूरा सोपवली होती.

या निर्णयानंतर मुंबई इंडियन्सवर बरीच टीका झाली होती. तसेच हार्दिकही मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. तसेच रोहितला मोठा पाठिंबा चाहत्यांकडून मिळाल्याचे दिसले होते. त्यातच लखनौविरुद्धच्या सामन्यातही रोहितने शानदार अर्धशतकी खेळी करत मुंबईला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला.

त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर त्याला प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओवेशनही मिळाली होती. अशात रोहित आणि नीता अंबानी यांच्यातील झालेल्या संभाषण चर्चेचा विषय ठरत आहे.

रोहितला मिळाले स्पेशल मेडल

दरम्यान, रोहितने लखनौविरुद्ध केलेल्या शानदार कामगिरीचे कौतुक सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये झाले. त्याला या सामन्यातील मुंबईसाठीचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्यामुळे त्याला नीता अंबानी यांनी खास मेडल दिले. याचा व्हिडिओही मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे.

लखनौसाठी शेवट गोड

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 214 धावा केल्या होत्या. लखनौकडून निकोलस पूरनने 29 चेंडूत 75 धावांची खेळी केली. तसेच केएल राहुलने 41 चेंडूत 55 धावांची खेळी केली. मुंबईकडून पीयूष चावलाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 6 बाद 196 धावाच करता आल्या. मुंबईकडून रोहितने 38 चेंडूत 68 धावांची खेळी केली. तसेच नमन धीरने 28 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली. लखनौकडून नवीन उल हक आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT