Gautam Gambhir | Nitish Rana Sakal
IPL

Gautam Gambhir : गंभीरने सहा महिन्यांपूर्वी केलेल्या 'त्या' मेसेजबद्दल KKR च्या नितीश राणाचा खुलासा; काय लिहिलेलं त्यात?

Nitish Rana: गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर झाल्यानंतर केलेल्या मेसेजबद्दल नितीश राणाने खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Gautam Gambhir : इंडियन प्रीमयर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने जिंकले. रविवारी चेन्नईत झालेल्या अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाताने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली.

कोलकाताचे हे आयपीएलचे तिसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी कोलकाताने २०१२ आणि २०१४ साली गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएल विजेतेपदाला गवसणी घातली होती. विशेष म्हणजे कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी गंभीरच्या मार्गदर्शनाखाली जिंकली. गंभीर या संघाचा आयपीएल 2024 साठी मेंटॉर होता.

दरम्यान, कोलकाताने रविवारी विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर नितीश राणाने गंभीरच्या एका मेसेजबाबत खुलासा केला आहे, जो मेसेज जवळपास 6 महिन्यांपूर्वीचा आहे.

कोलकाताचा स्टार क्रिकेटपटू नितीशने गंभीरचे कौतुक करताना म्हटले होते की 'मी एक छोटी गोष्ट सांगतो, जेव्हा गौतम भैय्याला मेंटॉर बनवले होते, तेव्हा मी त्याला एक लांबलचक मेसेज केला होता, कारण मी खूप खूश होतो.'

'त्यावर त्याने माझे आभार मानताना म्हटले होते की मला जर आपण ट्रॉफी घेऊन पोडियमवर उभे असू, तर मला आनंद होईल.' आज तो दिवस आहे, ज्यावेळी मी तो मेसेज कधीच विसरणार नाही.'

त्यानंतर आता मंगळवारी (28 मे) नितीशने गंभीरच्या त्या मेसेजचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. त्यात तो मेसेज 22 नोव्हेंबर 2023 रोजी केल्याचे दिसत आहे.

तसेच त्यात दिसते की गंभीरने लिहिले आहे की 'मेसेजसाठी धन्यवाद नितीश. आता काहीतरी स्पेशल करू. ट्रॉफी जिंकून पोडियवर उभे राहण्याशिवाय दुसरा आनंद खेळात नसतो. आपण आता त्याचा अनुभव घेऊ.'

तसेच नितीशने कॅप्शनमध्ये लिहिले की 'माम्बा मानसिकतेच्या या काळात लवकरच आपण जीजी (गौतम गंभीर) मानसिकतेलाही स्विकारू.'

गंभीर याआधी दोनवर्षे लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली लखनौने गेल्या दोनवर्षात प्लेऑफमध्येही स्थान मिळवले होते. त्यानंतर त्याने आयपीएल २०२४ आधी कोलकाताचा मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT