Rinku Singh Nitish Rana Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : चेन्नई सुपर किंग्ज आजचा केकेआरविरूद्धचा सामना जिंकून थाटात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होते. मात्र केकेआरच्या रिंकू सिंह आणि नितीश राणा या डावखुऱ्या जोडीने हंगामतील पहिली प्लेऑमध्ये प्रवेश करणारी टीम होण्यापासून सीएसकेला रोखले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 99 धावांची दमदार भागीदारी रचत चेन्नईचे 145 धावांचे आव्हान 6 गडी राखून पार केले. रिंकू सिंहने 43 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर कर्णधार नितीश राणाने 44 चेंडूत 57 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. सीएसकेकडून दीपक चाहरने 3 विकेट्स घेतल्या.
प्ले ऑफच्या गणिताचा विचार केला तर आज जर सीएसके जिंकली असती तर त्यांचे 13 सामन्यात 17 गुण झाले असते. ते यंदाच्या हंगामातील प्ले ऑफ गाठणारा संघ ठरले असते. मात्र केकेआरने सामना जिंकल्याने त्यांचे आता 13 सामन्यात 15 गुणच राहिले आहेत. ते अजूनही गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र आता त्यांचा फक्त एक सामना शिल्लक आहे.
दुसरीकडे केकेआरने आजच्या सामन्यात विजय मिळवत आपली गुणसंख्या 12 वर नेली आहे. मात्र त्यांचाही एकच सामना शिल्लक असल्याने त्यांच्या प्ले ऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
चेन्नईने केकेआरसमोर 145 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर केकेआरचे सलामीवीर फलंदाजी करण्यास मैदानात आले. मात्र केकेआरच्या सलामीवीरांना सीएसकेच्या गोलंदाजांनी एका एका धावेसाठी झुंजवले. पॉवर प्लेमध्ये 3 बाद 33 धावा अशी झाली. ही अवस्था सीएसकेच्या दीपक चाहरने केली होती.
मात्र यानंतर रिंकू सिंह आणि नितीश राणा या डावखुऱ्या जोडीने सीएसकेच्या गोलंदाजांची मक्तेदारी मोडून काढण्यास सुरूवात केली. नितीश राणा आणि रिंकूने चौथ्या विकेटसाठी 99 धावांची दमदार भागीदारी रचली. रिंकूने 43 धावात 54 धावांची अर्धशतकी खेळी केली.
या दोघांनी केकेआरला 3 बाद 33 धावांवरून 17 व्या षटकात 132 धावांपर्यंत पोहचवले. मात्र विजय जवळ आला असाताना रिंकू धावबाद झाला. त्यानंतर अर्धशतक पूर्ण केलेला कर्णधार नितीश राणाने रसेलच्या सोबतीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. नितीश राणाने 44 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली. या दोघांच्या जिवावरच केकेआरने आज सीएसकेला प्ले ऑफसाठी अजून वाट पहायला लावली.
तत्पूर्वी, आयपीएलच्या 16 व्या हंगामात प्ले ऑमध्ये जाण्यासाठी धडपडणाऱ्या चेन्नईची आज केकेआरसमोर अवस्था बिकट झाली होती. त्यांचा निम्मा संघ हा 72 धावात गारद झाला. मात्र डावखुऱ्या शिवम दुबेने नाबाद 48 धावांची झुंजार खेळी केली. त्याला रविंद्र जडेजाने 20 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. सलामीवीर डेवॉन कॉन्वेने देखील 30 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या 68 धावांच्या भागीदारीमुळे चेन्नईने 20 षटकात 6 बाद 144 धावांपर्यंत मजल मारली. केकेआरकडून वरूण चक्रवर्ती आणि सुनिल नरेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.