Nitish Rana Hrithik Shokeen  esakal
IPL

Nitish Rana : केकेआरच्या कर्णधाराची सोज्वळ दिसणाऱ्या ऋतिकला शिवीगाळ; VIDEO होतोय तुफान व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Nitish Rana Hrithik Shokeen : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात व्यंकटेश अय्यरने 104 धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर केकेआरने मुंबईसमोर विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले. मात्र या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणाला फारशी चमक दाखवता आली नाही. तो 5 धावा करून माघारी परतला. मात्र माघारी परतताने त्याचा मुंबईचा युवा क्रिकेटपटू ऋतिक शौकीनशी वाद झाला. यादरम्यान, नितीश राणाने शौकीनला शिवीगाळ देखील केली.

आयपीएलच्या 22 व्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली. स्वाभाविकच सूर्यकुमार यादवने केकेआरला पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. मात्र केकेआरची सुरूवात खराब झाली. ऋतिक शौकीनने जगदीशनला शुन्यावर बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला. त्यानंतर रहमानउल्ला गुरबाद देखील 8 धावांची भर घालून परतला.

डावखुरा फलंदाज व्यंकटेश अय्यरने मुंबईच्या गोलंदाजांवर काऊंटर अटॅक करत केकेआरला अर्धशतकी मजल मारून दिली होती. मात्र त्याला साथ देण्यासाठी आलेला कर्णधार नितीश राणा अवघ्या 5 धावात बाद झाला. या 5 धावा करण्यासाठी नितीश राणाने 10 चेंडू घेतले. दरम्यान, ऋतिक शौकीनच्या गोलंदाजीवर रमनदीप सिंगने राणाचा झेल पकडला. यानंतर राणा आणि शौकीन यांच्यात शाब्दिक देवाण घेवाण झाली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर व्यंकटेश अय्यरच्या 104 आणि आंद्रे रसेलच्या 21 धावांच्या जोरावर केकेआरने मुंबईसमोर 186 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान मुंबईने 17.4 षटकात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. मुंबईचा सलामीवीर इशान किशनला अखेर सूर गवसला असून त्याने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. याचबरोबर सूर्यकुमार यादवने देखील लौकिकास साजेशी 25 चेंडूत 43 धावांची खेळी केली.

(Sports Latets News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT