No Half Century By Mumbai Indians MI vs DC IPL 2024 : मुंबई इंडियन्स अखेर आपल्या घरच्या मैदानावर आपल्या जुन्या रंगात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 बाद 234 धावा ठोकल्या.
मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशनने 80 धावांची सलामी देत पाया रचला. त्यावर टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्डने कळस चढवला. त्यांनी शेवटच्या 4 षटकात 84 धावा चोपल्या. विशेष म्हणजे मुंबईने इतक्या धावा करून देखील त्यांच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. रोहित शर्माने सर्वाधिक 49 धावा केल्या.
आयपीएलच्या 17 व्या हंगामात इतिहासातील सर्वाधिक टोटल 277 धावा देखील झाल्या आहेत. मुंबईविरूद्धच सनराईजर्स हैदराबादने हा कारनामा केला होता. त्यावेळी देखील एकाही फलंदाजाला शतकी मजल मारता आली नव्हती. आता मुंबईने 234 धावा केल्या मात्र एकाही फलंदाजाने अर्धशतक ठोकलं नाही. यंदाच्या हंगामातील हे एक वेगळेपण म्हणता येईल.
मुंबईच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर रोहित अन् इशान किशनने दमदार सलामी देत 7 षटकात 80 धावा ठोकल्या. मात्र त्यानंतर मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. 115 दिवसांनंतर मैदानावर परतलेल्या सूर्याने 2 चेंडूत शुन्य धावा केल्या. तर तिलक वर्मा 6 धावा करून बाद झाला.
हार्दिक पांड्याने 33 चेंडूत 39 धावा केल्या खऱ्या मात्र त्याचे स्ट्राईक रेट त्याच्या लौकिकास साजेसे नव्हते. तो 118.18 च्या स्ट्राईक रेटने धावा करत 18 व्या षटकात बाद झाला. यानंतर मात्र टीम डेव्हिड आणि रोमारिया शेफर्डने यांनी धुमाकूळ घातला. डेव्हिडने 214 च्या स्ट्राईक रेटने 21 चेंडूत 45 धावा चोपल्या.
त्याच्यावर कडी केली ती रोमारियो शेफर्डने! त्याने 10 चेंडूत 39 धावा ठोकल्या. त्याचं स्ट्राईक रेट हे 390 होतं. नॉर्खियाच्या शेवटच्या षटकात शेफर्डने 4,6,6,6,4,6 असा फोन नंबर दिला! त्यानं 39 मधील 32 धावा या शेवटच्या षटकातच केल्या.
यंदाच्या आयपीएलमधील एक वैशिष्ट्य म्हणजे जे संघ स्ट्राईक रेटवर जास्त भर देत आहेत ते मोठमोठी धावसंख्या उभारत आहेत. त्यांच्या खेळाडूंना अर्धशतकाची अन् शतकाची तमा नसते. सनराईजर्स हैदराबादनंतर आता मुंबई इंडियन्सनं हे करून दाखवलं आहे. त्यांच्या फलंदाजांनी साधारणपणे 200 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. या धावा 40 ते 45 धावांच्या दरम्यानच होत्या. मात्र त्या इम्पॅक्टफुल होत्या.
सारा खेळ स्ट्राईक रेटचाच:
रोहित शर्मा - 27 चेंडूत 49 धावा स्ट्राईक रेट 181.48
इशान किशन - 23 चेंडूत 42 धावा स्ट्राईक रेट 182.61
टीम डेव्हिड - 21 चेंडूत 45 धावा स्ट्राईक रेट 214. 29
रोमारियो शेफर्ड - 10 चेंडूत 39 धावा स्ट्राईक रेट 390.00
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.