ICC Ranking ODI 
IPL

ICC Ranking ODI : IPL सुरू असतानाच पाकने साधला डाव! भारत, ऑस्ट्रेलियाला मागे टाकत पोहचला पहिल्या स्थानी

Kiran Mahanavar

ICC Ranking ODI : एकीकडे भारतीय संघ आयपीएल खेळ आहे तर दुसरीकडे बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ चांगली कामगिरी करत आहे. पाकिस्तान संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 102 धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानचा संघ आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानने भारत आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. पाकिस्तानच्या संघाचे 113 गुण असून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या बरोबरी आहे, मात्र दशांश संख्येत पाकिस्तानी संघ पुढे आहे. पाकिस्तान (113.483) आणि ऑस्ट्रेलिया (113.286) यांना गुण मिळाले आहेत. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानचा संघ प्रथमच आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

कराची वनडेनंतर जाहीर झालेल्या ताज्या वनडे क्रमवारीत पाकिस्तान संघ 113 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारताचेही समान गुण आहेत, मात्र पाकिस्तानपेक्षा निर्धारित वेळेत जास्त सामने खेळल्यामुळे या संघांचे स्थान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पाकिस्तानसाठी ही मोठी उपलब्धी आहे.

पाकिस्तान संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने सहज जिंकले होते, आता चौथ्या सामन्यातही या संघाने किवींचा मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 6 गडी गमावून 336 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 50 षटकेही पूर्ण करू शकला नाही. किवी संघ अवघ्या 43.4 षटकात 232 धावांवर गारद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT